लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात भारतीय डॉक्टराविषयी जे उद्गार काढले त्याचा राज्यभर एएमआय संघटनेच्या वतीने निषेध केला जात असून लातूरात डॉक्टराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून काळ्या फिती बांधून काम केले. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी लंडन मध्ये ज्या पद्धतीने टीका केली आहे त्याचे स्वरूप आणि त्यासाठी वापरलेली भाषा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास शोभत नाही. भारतीय डॉक्टर त्यांच्या कौश्याबद्दल जगभरात नावाजले जातात. अमिरेका, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशात त्यांचा गौरव झालेला आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय जगताची प्रतिमा मलीन करणारी भाषा परकीय भूमिवर राष्ट्रप्रमुखाकडून वापरणे अपेक्षित नाही. परदेशी रूग्ण भारतातील दर्जेदार व वाजवी दरात उपलब्ध असलेले ओषध उपचार घेतात. आधीच सलाईनवर असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सरकारच्या दुर्लक्षामुळे डबघाईस आलेली आहे. औषधे, कृत्रीम अवयव, डोळ्याची लेन्स, हृदयाचे स्टेंट इत्यादीच्या किंमती, सर्वसामान्यांना परवडाव्या अशा ठेवाव्यात यासाठी आम्ही नेहमी सरकारकडे पाठपुरावा केला. शासनाच्या फसव्या धोरणामुळे त्याला आलेले अपशय झाकण्यासाठी आणि संवग लोकप्रियेतेकरिता केलेली शेरेबाजी डॉक्टरांबाबत मानहानीकारक आहे असा दावा डॉक्टरांनी केला. भारतातील डॉक्टर औषध कंपन्यांच्या सहलीस परदेशात जातात असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना आयएमए अध्यक्ष डॉ भराटे रमेश, कोषाधयक्ष डॅा सुधाकर सुडे, उपाध्यक्ष डॉ आमिर शेख, डॉ अजय जाधव, डॉ सोमवंशी जीआर, वारद संजय व डॉ वसुधा जाजू उपस्थित होते.
Comments