लातूर: राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर-भजनी परिषदेच्यावतीने मराठवाडास्तरीय पारंपारिक लोककला महोत्सव दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा लोककला महोत्सव ०१ मे रोजी आयोजित सादर केला जाईल अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष शैलेश गौजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या लोककला महोत्सवात गोंधळी, वासुदेव, आराधी, भजनी, वाघ्या किर्तनकार, शाहिर भारूड, कव्वाली, भीम गीत आदी कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, रमेशअप्पा कराड उपस्थित राहणार आहेत. सांगता समारोह, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्रजी तिरुके, शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जेष्ठ विचारवंत अशोक कुकडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पत्रकार परिषदेत उपमहापौर देवीदास काळे, संयोजक राजेंद्र वनारसे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी संपर्क प्रमुख अजय भुमकर, कला दिगदर्शक सिद्धेश्वर बिराजदार, भारूड सम्राट बालाजी गाडेकर, शिवकुमार स्वामी, डॉ. नागोराव बोरगावकर, मनोहर पानगावेकर, वैजीनाथ दुडे, वैभव वनारसे उपस्थित होते.
Comments