लातूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन ०१ मे रोजी बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्या हस्ते महसूल, क्रीडा, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभागातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते महसूल विभागांतर्गत आदर्श तलाठी म्हणून भारत गोपीनाथ मुंढे (सज्जा- धसवाडी ता. अहमदपूर) यांना प्रमाणपत्र व ०५ हजार रुयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शहिद जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाच्या मार्फत आजीवन प्रवास सवलत देऊन सन्मानित केले. यामध्ये मुद्रीका प्रकाश कांबळे, मीरा बाळासाहेब उत्के, सविता शिवाजी पाटील, पुष्पलता धनंजय कुलकर्णी यांचा समावेश आहे. क्रीडा विभागाचे जिल्हा युवा पुरस्कार (युवक) उदगीर येथील श्री. विनोद सुरेश पदमगीरवार, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) श्रीमती ज्योती मलिकार्जुन कापसे (माळी) यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर जिल्ह्यातील आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस कार्यालय व ठाणे यांना ही सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, औसा (गणेश किंद्रे), पोलीस स्टेशन मुरुड (विश्वजीत घोडके), पोलीस स्टेशन औराद (सुनिल रेजीनवाड), पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण (राजकुमार सोनवणे), पोलीस स्टेशन किल्लारी (मोहन भोसले), पोलीस स्टेशन कासार शिरसी (वलांनी कुकडे) आदींना प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल सुखदेवराय विरकर (पोलीस हवालदार) चिमाजी धोंडीबा बाबर (पोलीस हवालदार) एस.ए. पठाण, पोलीस निरीक्षक (परिवहन) अशोक गणपतराव गायकवाड (पी.एस.आय.) विद्याधर रंगनाथ टेकाळे (ए.एस.आय.) संजीवकुमार अनिरुध्द भिकाणे (पो. हवालदार) प्रविण बब्रुवान सुर्यवंशी (पो. हवालदार) राजेंद्र मनोहर टेकाळे (पोलीस नाईक) दशरथ गोविंदराव तलेटवार (पी.एस.आय) आदिंचा समावेश आहे.
Comments