लातूर: पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वॉटर कॅप स्पर्धेच्या माध्यमातून जलक्रांती केली जात आहे. यात औसा तालुक्यातील फत्तेपुर या गावानेही भाग घेतला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिने अभिनेते आमीरखान व अलिया भट आले असता श्रमदानानंतर गावकरी व लातूर येथून आलेल्या स्वयंसेवकांसह त्यांनी संवाद साधला. यावेळी लातूर येथील दांमपत्याने स्वच्छता उपक्रमांना प्रेरीत होवून स्वतःच्या मुलीचे नाव स्वच्छता असे ठेवले असून ती देशातील पहिली स्वच्छता आहे हे समजताच त्यांना बोलावून घेवून स्वच्छताची भेट घेतली व तिच्या माता पित्यांचे कौतूक केले, आस्थेवायीकपणे चौकशी केली. यावेळी उपस्थीत असलेले मनपा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांना लातूर मधील स्वच्छता उपक्रमांची व कच-यापासून होत असलेल्या खत निर्मीती प्रकल्पाची माहिती दिली व खत भेट स्वरूपात त्यांना दिला. तसेच त्यांच्या सत्यमेव जयते या मालिकेतून याची प्रेरणा मिळाल्याची माहीती दिली. अभिनेते आमीर खान व अलिया भट यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले व आनंद व्यक्त केला. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या समवेत स्वच्छतेचे माता पिता मोहन कुरील, काजल कुरील, सुभाष पंचाक्षरी, चेतन कोल्हे, प्रा. ओमप्रकाश झुरळे, रेवन काडोदे उपस्थित होते.
Comments