लातूर: लातूर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. या पार्श्वभूमीवर नळदुर्गचे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अशोक जगदाळे यांना दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घडामोडीचं समर्थन करीत जगदाळेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. या घटनाक्रमाच्या मागे कराडांना काय आमीश दिलं गेलं असेल ते अजून गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीच्या निकालाअंती पंकजा मुंडे सरस ठरल्या की राष्ट्रवादी याचा अर्थ लावता येऊ शकतो. आजच्या घडीला पक्षांच्या निर्णयाला अंतिम मानत एकमेकांची डोकी फोडणार्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या काळजाचं मात्र नक्कीच पाणी झालं असणार!
आधी राष्ट्रवादी पुन्हा भाजपा, पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास करणारे, मागच्या निवडणुकीत निसटता पराभव स्विकारणारे रमेश कराड यांना पुढे भवितव्य काय असा प्रश्न नक्कीच पडला असणार. पक्ष अदलाबदली अन अर्ज मागे घेणे यामुळे सामान्यजनात मात्र त्यांची नाचक्की झाली आहे एवढं मात्र खरं आहे. असल्या बदलाबदलीवर ज्येष्ठ नेते मात्र बोलत नाहीत. ते का बोलत नाहीत असा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे. याबाबत अजून तरी कॉंग्रेसची प्रतिक्रिया आली नव्हती.
Comments