HOME   लातूर न्यूज

५२५ कुटुंबे झाली पहिल्यांदाच प्रकाशमय


५२५ कुटुंबे झाली पहिल्यांदाच प्रकाशमय

लातूर: केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या सौभाग्य योजनेअंतर्गत महावितरणने भारतरत्न्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत पंधरवाडा ग्राम स्वराज्य अभियान राबविले. या अभियानात १२ गावांची निवड करून ५२५ कुटुंबांमध्ये पहिल्यांदाच मोफ़त वीज जोडण्या देऊन प्रकाश करण्यात आला. ’प्रत्येक घरात वीज’ असे सौभाग्य योजनेचे स्वरूप आहे. ज्या गावात ८० टक्के दलीत समाजाची वस्ती आहे व त्यांची परिस्थीती हालाकिची आहे आणि त्यांच्या घरी वीज कनेक्शन नाही, अशा गावांचि या योजनेत निवड करून तेथे डिसेंबर २०१८ पर्यंत वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, महावितरणने भारतरत्न्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि. १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत पंधरवाडा ग्राम स्वराज्य अभियान राबविले. या अभियानात १२ गावांची निवड करून ५२५ कुटुंबांमध्ये पहिल्यांदाच मोफ़त वीज जोडण्या दिल्या. लातूर परिमंडलात नांदुरा, मेवापूर, येवरी, भोपणी, हंगरगा, कासराल, नागलगाव, पोहनेर, मुरळी, ब्राम्हणगाव, साडोला आणि दैठणा या बारा गावाची सौभाग्य योजनेसाठी ग्राम स्वराज्य अभियानात निवड करण्यात आली. या बारा गावात मेळावे घेऊन वीज जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये २६ एप्रिलपर्यंत लातूर जिल्ह्यात १३४, उस्मानाबाद ६८, तर बीड जिल्ह्यात ११९ वीज जोडण्या देण्यात आल्या.


Comments

Top