औसा: शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची शासनाची मानसिकता नसल्याने खरेदी साठी बारदाना उपलब्ध करुन दिला जात नाही यामुळे औसा येथील तूर खरेदी केंद्रावर अतिशय संथ गतीने तूर खरेदी होत आहे मंगळवार ही तूर खरेदीची अखेरची तारीख असल्याने शासनाने सर्व तूर आणि हरभरा खरेदी करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. औसा येथील केंद्रावर मागील ४ दिवसापासून तूर खरेदी बंद असल्यासारखीच आहे शेवटचा दिवस असल्याने शेकडो शेतकऱ्यांनीआपली तूर विक्री करण्यासाठी केंद्रावर आणली आहे पण बारदाना नसल्याने खरेदी होत नाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास १५० वाहनातून तूर आणली आहे. शेतकऱ्यांनी भाड्याची वाहने करुन माल विक्रीसाठी आणला आहे. ही वाहने ०३ दिवसापासून उभी असल्याने त्याचे भाडे शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. सरकारची मानसिकता नसल्याने शेतकरी दोन्ही बाजूनी नागवला जात आहे. तूर विक्री होत नाही आणि पदरचे भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे सरकारने केंद्रावर आलेली सर्व तूर आणि हरभरा खरेदी करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी एमआयडीसीच्या प्रवेश द्वाराजवळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे या आंदोलानाची दखल घेवून शासनाने संपूर्णतूर खरेदी करावी तूर खरेदी होइपर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश माडजे, दत्ता गुंजोटे, दत्तू टिपे यांनी दिला आहे.
Comments