HOME   लातूर न्यूज

लातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अमित पांडे तर सचिवपदी विक्रांत शंके


लातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर

लातूरः आपचे लातूर जिल्हा निरीक्षक सतीष संचेती आणि लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक अजिंक्य शिंदे यंनी लातूर शहर जिल्हा विधानसभा मतदार संघाची आम आदमी पार्टीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात अध्यक्षपदी अमित पांडे तर सचिवपदी विक्रांत शंके यंचा समावेश आहे. आम आदमी पार्टी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पार्टीचे संघटन मजबूत करुन पार्टीचे कार्य वाढविण्यासाठी राज्यातील तालुका, जिल्हा, विभाग कार्यकारिणीची निवड करण्यात येत आहे,त्याचा एक भाग म्हणून लातूर शहर जिल्हा विधानसभेची कार्यकारिणी आपचे लातूर जिल्हा निरीक्षक सतीष संचेती आणि लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक अजिंक्य शिंदे यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष-अमित पांडे, सचिव -विक्रांत शंके,उपाध्यक्ष-सुमीत दीक्षित, सहसचिव- शाम माने, कोषाध्यक्ष-शिवलींग गुजर, प्रसिध्दी प्रमुख-बाळ होळीकर, सोशल मिडीया प्रमुख-हरी गोटेकर, महिला आघाडी अध्यक्षा- झारा शेख, ऑटोरिक्षा आघाडी- नैमोद्दीन शेख,सदस्य नितीन चालक यंचा समावेश आहे.


Comments

Top