HOME   लातूर न्यूज

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने मागितली भीक, ३० रुपये जमले!

सामान्यांचे जगणे कठीण, सलग १२ दिवस दरवाढ, सरकार लक्ष देईना


इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने मागितली भीक, ३० रुपये जमले!

लातूर: इंधन दरवाढीने सबंध देश त्रस्त झाला आहे. सलग बारा दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात इंधनाचे दर कमी आहेत. याचा निषेध करीत लातुरच्या युवक राष्ट्रवादीने विडंबनात्मक भीक मागण्याचे आंदोलन केले. अनेकांकडून भीक घेण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भीक मांगो आंदोलन व सरकारच्या विरोधात निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण नाबदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. गंजगोलाईसारख्या ठिकाणी राष्ट्रवादीला केवळ ३० रुपयांची भीक मिळाली! ती त्यांनी संबंधितांना लगेच परत करुन टाकली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विशाल विहीरे, मुन्ना तळेकर, ताज शेख, प्रविणसिंह थोरात, अशिष हाजगुडे, चाँद शेख, नवाज शेख, बालाजी गुट्टे उपस्थित होते.


Comments

Top