HOME   लातूर न्यूज

सरकारी दवाखान्यात बाळंतीणीची आत्महत्या

कावीळग्रस्त बाळावर उपचारासाठी पैसे नसल्याने आले नैराश्य


सरकारी दवाखान्यात बाळंतीणीची आत्महत्या

लातूर: लातुरच्या सरकारी दावाखान्यात २० वर्षीय बाळंतीणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मजुरी करुन उदरनिर्वाह भागवणार्‍या राधिका चव्हाणच्या बाळाला कावीळ झाली होती. तिच्याकडचे सगळे पैसे संपले होते, आता बाळावर उपचार कसे करायचे या विवंचनेतून राधिकाने स्वच्छतागृहातील खिडकीच्या गजाला गळफास घेतला असे सांगण्यात आले. २७ मे रोजी राधिका प्रसूत झाली होती. प्रसूतीदरम्यान रोजंदारीमध्ये खंड पडल्यामुळे जवळचे पैसे संपले होते. स्वत:च्या बाळावर आपण उपचार करु शकत नाही यातून तिला नैराश्य आले असावे. सरकारी दवाखान्यात बाळावर उपचार का होऊ शकले नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.


Comments

Top