HOME   लातूर न्यूज

जीवन रेखा एक्सप्रेस १५ जून रोजी लातुरात

०२ जुलै पर्यंत नागरिकांना देणार मोफत आरोग्य सुविधा, लाभ घेण्याचे आवाहन


जीवन रेखा एक्सप्रेस १५ जून रोजी लातुरात

लातूर: रेल्वे विभागाची जीवन रेखा एक्सप्रेस (लाईफ लाईन एक्सप्रेस ) हे सात डब्यांचे अदयावत असे रुग्णालय १५ जून रोजी लातूर रेल्वे स्थानकावर येत आहे. ०२ जुलैपर्यंत ही आरोग्य वाहिनी लातूर मुक्कामी थांबणार असून जिल्हयातील रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या एक्सप्रेस रुग्णालयाला लातूर जिल्हा प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जीवन रेखा एक्सप्रेस बाबतच्या पूर्व तयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, निवासी वैदयकीय अधिकारी माधव शिंदे, लाईफ लाईन एक्सप्रेसचे उपसंचालक अनिल प्रेम सागर यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, लाईफ लाईन एक्सप्रेससाठी लातूर रेल्वे स्थानकावर ज्या सुविधा आवश्यक आहेत. त्या सर्व सुविधा संबंधित विभागांनी तात्काळ उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच या अद्ययावत रेल्वे रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ जिल्हयातील गरजू रुग्णांना मिळावा यासाठी शहरी व ग्रामीण भागात प्रबोधन मोहिम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.


Comments

Top