HOME   लातूर न्यूज

वैरागड गाव झाले धूर विरहित, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गॅसचे वितरण

डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानचा पुढाकार, मुद्रा योजनेत कर्जाचेही वाटप


वैरागड गाव झाले धूर विरहित, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गॅसचे वितरण

लातूर: अहमदपूर तालुक्यातील वैरागड हे गाव आदर्श ग्रामच्या दिशेने वाटचाल करीत असून या गावातील ५५ कुटुंबांना डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण करण्यात आले. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून वैरागड गाव आदर्श ग्राम बनविण्यासाठी डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने अविरत प्रयत्न केले जात आहेत. गाव धूरमुक्त करण्यासाठी गावातील ५५ कुटुंबाना गॅस वितरण करण्यात आले. गावातील सुशिक्षित युवकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी प्रधानमंत्री मुद्रा ऋण योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे मुद्रा ऋणही वितरित करण्यात आले. डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यासाठी निवृत्ती यादव यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आदर्श ग्राम संकल्पनेच्या पूर्तीसाठीही प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगाने, डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती यादव, प्रा. मारोती पाटील, ओम गॅस एजन्सीचे संचालक ऋषिकेश खंडागळे, संदिपान बेंबडे, उपसरपंच बालाजी राजपंगे, बालाजी गायकवाड, मोईन पटेल, श्रीधर तराटे अदिसह गावातील महिला - युवकांची उपस्थिती होती.


Comments

Top