लातूर: शेतकर्यांनी पुन्हा सुरु केलेल्या संपाला उत्तरोत्तर उग्र स्वरुप येत आहे. शहरांची रसद बंद करण्याचा इशारा देण्यात आला. अनेक ठिकाणी दूध आणि भाज्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. आपल्या जवळच्या तांदुळज्यात शेतकरी आंदोलकांनी नवीन शक्कल लढवली. रांजणीच्या नॅचरल दुधाची गाडी अडवून त्यातल्या दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. या ठिकाणी आंदोलकांनी आपला शेतीमाल किंवा दूध रस्त्यावर फेकले नाही! या वाहनाचा चालक लहू भडंगे आणि सुपरवायझर शुभम पानढवळे यांना मारहाणही केली. वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या दुधाच्या पिशव्या, लस्सी, दही, तूप रस्त्यावर फेकून दिले. यात सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात चाळीस-पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Comments