लातूर: वैद्यकिय व दंतवैद्यकिय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट २०१८ परीक्षेचा निकाल काल केंद्रीय शिक्षण मंडळ, दिल्ली यांच्याद्वारे जाहिर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी आपल्या यशाचा नवीन उचांक प्रस्थापित केला आहे. उपलब्ध ११३८ विद्यार्थांच्या निकालातून महाविद्यालयाच्या एकूण ९ विद्यार्थांनी ६०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असून ५५० पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थांची संख्या ४५ आहे तर ५०० पेक्षा अधिक गुण घेणारे एकुण १४८ विद्यार्थी आहेत. ४७५ पेक्षा अधिक गुण घेणारे २२०, ४५० पेक्षा अधिक गुण घेणारे ३१२ आणि ४२५ पेक्षा अधिक गुण घेणारे ४२५ विद्यार्थी आहेत. सत्यम वसंत मांटे हा महाविद्यालयातुन प्रथम आलेला विद्यार्थी ६४५ गुणांसह राष्ट्रीय पातळीवर सर्वसाधरण गटातून २०० व्या क्रमांकावर व इतर मागासवर्गीय संवर्गातून देशात ३२ व्या क्रमांकावर आहे. एजाजअहमद अब्दुल कुमपरांडे हा विद्यार्थी ६४१ गुणांसह महाविद्यालायातून दुसरा तर देशात सर्वसाधारण संवर्गातून २३४ आणि इतर मागास संवर्गातून ४१ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. फय्याज फिरालाल बागवान हा विद्यार्थी ६३० गुणांसह महाविद्यालयातील तिसरा तर सर्वसाधारण गटातून देशात ४२१ व इतर मागास संवर्गातून ७९ व्या स्थानावर आहे. सर्वसाधारण संवर्गामध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या १ हजार विद्यार्थांमध्ये या महाविद्यालयाचे एकूण ६ विद्यार्थी असून इतर मागासवर्गीय संवर्गातून संवर्गनिहाय देशात प्रथम १०० विद्यार्थांमध्ये ३ व ५०० विद्यार्थामध्ये ५, अनुसूचित जाती संवर्हातुन प्रथम १०० मध्ये १ विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील सर्वसाधारण संवर्गातून किमान ४२३ विद्यार्थी, तर इतर स्रर्व राखीव संवर्हातुन किमान १२८ विद्यार्थी असे एकूण ६५१ विद्यार्थांसह शासकीय व अशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खात्रीशीर प्रवेश मिळू शकतो आणि किमान १२० विद्यार्थी शासकीय व अशासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खात्रीशीर प्रवेश मिळवतील अशी अपेक्षा आहे.
Comments