HOME   लातूर न्यूज

माईर्स एमआयटी येथे जागतिक योग दिनाचे आयोजन


माईर्स एमआयटी येथे जागतिक योग दिनाचे आयोजन

लातूर: जागतिक योग दिनानिमीत्त माईर्स एमआयटी, लातूर येथे गुरुवार, २१ जून २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता ‘डोम’ येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात योगशिक्षीका सौ. गंधाली वारद या उपस्थितांना योगाविषयी मार्गदर्शन करुन योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सरिता मंत्री, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रफी मोहमद, एमआयएनएस नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वनन सेना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. योग दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय, नर्सींग महाविद्यालय या महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सरिता मंत्री यांनी केले आहे.


Comments

Top