HOME   महत्वाच्या घडामोडी

उद्या शेतकरी दिल्लीत, राजे म्हणतात ‘पद्मावती’ थांबवा, मानुषी विश्वसुंदरी, भाजपची ब्लू फिल्म, ४२० शेतकरी आत्महत्या, सोयाबीनला मिळेल चांगला भाव......१९ नोव्हेंबर २०१७


उद्या शेतकरी दिल्लीत, राजे म्हणतात ‘पद्मावती’ थांबवा, मानुषी विश्वसुंदरी, भाजपची ब्लू फिल्म, ४२० शेतकरी आत्महत्या, सोयाबीनला मिळेल चांगला भाव......१९ नोव्हेंबर २०१७

* महापूरजवळील नदीत सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह, रेणापूर पोलिसांनी केला पंचनामा
* जपानमध्ये रेल्वे २० सेकंद आधी सुटल्याने कंपनीनं मागितली माफी!
* सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचे आज लातुरच्या दयानंद सभागृहात व्याख्यान
* लातुरात चालू असलेल्या शिक्षणाच्या वारीचा आज समारोप
* आगामी काळात सोयाबीनला चांगला भाव मिळेल- कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
* सोयाबीन आयात शुल्क ३० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर- केंद्र सरकारचा निर्णय
* पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या आयातीवरील शुल्कात दुपटीने वाढ, बेबंद आयातीला बसणार चाप
* उद्या जळोकटला कॉंग्रेसचा आक्रोश मोर्चा
* मांजरा परिवारासह इतर कारखान्यांनी ऊसाला २५२५ रुपयांची पहिली उचल द्यावी, अन्यथा उपोषण, लातुरचे शेतकरी भेटले जिल्हाधिकार्‍यांना
* लातूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादीची आज शिवनेरी हॉटेलात बैठक
* घरपोच धान्य पुरवठा योजनेचा पालकमंत्र्यांनी औसा येथे केला शुभारंभ
* मुख्यमंत्र्यांच्या विधानाविरोधात लातुरच्या नाभिक समाज बांधवांनी पाळला एक दिवसाचा बंद
* लातूर जिल्ह्यातील १४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल
* बॅंकेत मराठी तरुणांना नोकर्‍या आणि मराठी पाट्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरणार- राज ठाकरे
* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०० वी जयंती, देशभरात विविध कार्यक्रम
* यंदाचा इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जाहीर
* सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेकडून भजन किर्तन
* ऊसाला २७०० रुपयांचा किमान भाव देण्याची शेतकर्‍यांची मागणी
* राज्य गृहमंत्री दीपक केसरकरांची प्रकरणं बाहेर काढणार, याला कायमचा घरी बसवा- नारायण राणे
* नागपुरात तीन दिवसांच्या राष्ट्रीय योग संमेलनाला सुरुवात, देशभरातून योग साधक नागपुरात
* मुंबई मनपा वार्‍यावर! चार अतिरिक्त आयुक्तांना दिली गुजरात निवडणुकीत ड्युटी, बेस्टच्या महाव्यवस्थापकांचाही समावेश
* संजय लिला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ सिनेमा दाखवला राजपूत नेते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना
* ‘प्रद्मावती’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे मागणी
* जम्मू काश्मिरात बर्फवृष्टी, अनेक रस्ते झाले बंद, बद्रीनाथ, मनालीतही बर्फवृष्टी
* शिर्डी-हैद्राबाद आणि मुंबई विमानसेवेला मोठा प्रतिसाद, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसाठीही सुरु होणार विमान सेवा
* उद्या २० तारखेला दिल्लीत देशभरातील शेतकर्‍यांचं आंदोलन, कोल्हापुरातून स्वाभिमानी किसान एक्स्प्रेस रवाना, एक्स्प्रेस सजवली ऊसांनी
* हरयाणातील सोनीपतची मानुषी छिल्लर ठरली विश्वसुंदरी, नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
* जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरात चकमकीत ०६ दहशतवाद्यांचा खात्मा, एक कमांडो शहीद, मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीरचा पुतण्या ओवैद ठार
* शेतकऱ्यांच्या मदतीस राज्य धावून येत नसल्याने ११ डिसेंबरला मोर्चा विधानसभा चालू देणार नाही, राज्य चालू देणार नाही- शरद पवार
* राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरला मतदान, सरपंचपदासाठी होणार थेट निवडणुक
* मनसेने विधानसभा निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट आणली तर भाजप ब्लू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवत आहे- राज ठाकरे
* हार्दिकच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा भाजपला अधिकार नाही- राज ठाकरे
* फेरीवाल्यांकडून वर्षाला ०२ हजार कोटींचा हप्ता मिळतो म्हणून सगळे पक्ष मूग गिळून गप्प बसले आहेत?- राज ठाकरे
* पुण्यातील खाजगी धर्मादाय हॉस्पिटल राज्यातील विविध शहरांमध्ये तीन डिसेंबरला भिकारी, झोपडपट्टीसह गरीब पेशंटना शोधणार
* डीएस कुलकर्णी यांच्यावर कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता न भरता अपहार केल्याचा गुन्हा दाखल
* विदर्भात ०६ जिल्ह्यांतील ४२० शेतकर्‍यांनी ०४ महिन्यांत आत्महत्या केल्याची माहिती सरकारी अहवालातून उघड
* ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणे काम करण्यास परवानगी द्या- दंत वैद्यांची मागणी
* राज्यातील सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये पदविका प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे झाले अनिवार्य
* ९१ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारीला बडोद्यात
* शिर्डीहून शनी शिंगणापुरला निघालेल्या भाविकांच्या काळी-पिवळी जीपला झालेल्या अपघातात ०४ ठार ०६ जण गंभीर जखमी
कोपर्डी खटलाः कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, शिक्षेनंतर कोणीही अत्याचाराला धजावणार नाही- मुख्यमंत्री
* भारतात दरवर्षी ४५ हजार महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू प्रसुती तज्ञांच्या परिषदेत माहिती
* गटा तटाच्या राजकारणाने माणुसकी हरवत आहे, पक्षाला पूर्ण संपविण्याची भाषा करणाऱ्यांनो, हीच का ती लोकशाही?- गांधी विचारवंत राधाबेन भट
* नागपूरमधील सर्वोदय आश्रमात ‘लोगो का गांधी लोगो तक’ परिसंवाद, देशाचे आजचे चित्र पाहता नव्या पिढीला गांधी विचारांची अधिक गरज- राधाबेन
* पतियाळा कोर्टाने अबू सालेमच्या हस्तांतरणाच्या २००२ च्या याचिकेवरील सुनावणी ढकलली २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे
* ‘मूडीज’च्या पतमानांकनामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेबाबत सर्वकाही सुरळीत झाल्याच्या भ्रमात सरकारने राहू नये- डॉ. मनमोहनसिंग
* निश्चलनीकरणामुळे देशातील जनतेने झळ सोसली, बाकी काहीही साध्य झाले नाही- पी. चिदम्बरम
* पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत- फ़ारुख अब्दुल्ला


Comments

Top