आजलातूर: लातुरात आदर्श गोष्टी जन्मायला वेळ लागत नाही आणि त्याची नासाडी किंवा बेकिंमत व्हायलाही वेळ लागत नाही. मध्यंतरी सुशोभित लातूर शहराची टूम निघाली. जिल्हा बॅंक, जेएसपीएमने राजीव गांधी चौक आणि बसवेश्वर चौक सजवला. कारंजे बसवले, त्यावर रंगीबेरंगी लाईटही सोडले. हे चौक रात्री उत्तम दिसतात. तसाच गांधी चौकही सजवला. तो आता मात्र कपड्यांच्या टायझर कंपनीमुळे टायझर चौक झाला आहे. बसवेश्वर चौकातली कारंजी उत्तम दिसतात. पण त्याच्या ऐन तोंडावर मनसेनं भला मोठाखलक लावला आहे. चौक सजवायचा कुणीतरी आणि त्याला पळवायचं कुणीतरी असा प्रघात सुरु झालाय. सुशोभित लातूर टीम कुठे गेली आणि त्यांना हे का दिसत नाही असं कोडं सामान्यांना पडलं आहे.
Comments