HOME   टॉप स्टोरी

...पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचंय

आई-बाबा सतत मोबाईलमध्ये दंग असतात, माझ्याकडे कुणाचेच लक्ष नाही!


...पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचंय

लातूर: व्हॉट्सअ‍ॅप बरेच बदनाम आहे. पण यावर काही गोष्टी अफलातून येतात. काहींना तर तोडच नसते. मोबाईलवर सतत दंग असणारे आई-बाबा एका बालमनाला चटका लावून जातात. हा चटका आपल्याही जिव्हारी लागतो. तो एका कवीनं शब्दबद्ध केलाय. त्या अज्ञात कवीला सलाम!
त्या कवीची पावानगी आहे असं समजून ती इथे सर्वांसाठी देत आहोत.
मम्मी सोड *मोबाईल*
माझ्या सोबत बोल
थोडावेळ बागेमध्ये
खेळु आपण चल...!

सोबत तुला नेहमी
*मोबाईल* लागतो केवळ
घरी आल्यावर तरी
घे ना मला जवळ...!

रात्रभर *मोबाईल*
असतो तुझ्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर
सोबत ठेवते कशाला...?

पप्पा आज *मोबाईल*
ऑफिसमध्ये विसरा
माझा चेहरा होईल
आनंदाने हसरा...!

दिवसभर *मोबाईल*
तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून
सांगा कधी फिरता...?

पुढच्या जन्मी मला
*मोबाईल* व्हायच आहे
कारण मला दिवसभर
मम्मी आणि पप्पांसोबत
रहायचं आहे...!


Comments

Top