लातूर: लातुरचे रस्ते लोण्यासारखे आहेत, म्हणूनच तर वाहनधारक वेगाने फिरत असतात. त्यांचा वेग रोखण्यासाठी मनपाने जागोजागी अफलातून गतीरोधक बांधले. हे गतीरोधक कुणाचे कंबरडे मोडतात, कोणाच्या गाड्या घसरवतात, कुणाच्या वाहनांचे नुकसान करतात. कुणाच्या मानांचे नुकसान करतात. न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे हे गतीरोधक बांधण्यात आले नाहीत. त्याचा परिणाम लातुरकरांना भोगावा लागत आहे. याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर उड्डाण पुलाखालील गतीरोधक काढून टाकले आहेत. बाकीचे लवकरच काढून टाकले जाणार आहे अशी माहिती उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.
Comments