अनेकवेळा घडला प्रकार, पोलिसात तक्रार, मॅनेजर दवाखान्यात
लातूर: लातुरच्या एमआयडीसीतील अनेक कंपन्यात काम करणार्या महिलांचे भवितव्य अंधारात आहे. महिलांची छेडखानी, कार्यालयातील वरिष्ठांकडून होणारा शारिरिक-मानसिक त्रास अशा प्रकारांना या महिलांना सामोरं जावं लागतं. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. नांदणीच्या गणेश बेकरीमध्ये काम करणार्या एका महिलेचा मुका मॅनेजरने जबरीने अनेकवेळा घेतला. त्यानंतर हात धरला. ही बाई मुळची कासारखेडची, नांदते झरीला आणि काम करते लातुरच्या एमआयडीसीत. याचा बरोबर फायदा मॅनेजर दीपक मालगावे याने उचलला असं ही महिला सांगते. याचा बोभाटा उठल्यानंतर सगळ्या महिलांनी काम बंद ठेवलं. उपस्थित महिलांनी प्रशासनाची बाजू घेतली. मॅनेजर बाईंना चक्कर आली. विमानाच्या वेगाने कार आली आणि बाईंना दवाखान्यात घेऊन गेली! हे सबंध प्रकरण हरंगुळचे माजी सरपंच व्यंकट पनाळे यांनी उघडकीस आणले. आमच्या भागात असे स्त्रीलंपट माणसं नकोत, ते पुन्हा दिसता कामा नयेत अशी तंबीही त्यांनी दिली.
पिडीत महिला
गणेश बेकरी, एमआयडीसी
झाला विनयभंग
मॅनेजरकडून विनयभंग
पुन्हा अशी लोकं दिसू नयेत
फॅक्ट्री आज बंद
महिला बाहेर
बोलण्यासाठी पुरुषच नाही
मॅनेजरबाई नाव सांगायला तयार नाहीत
अखेर गेल्या दवाखान्यात
एमआयडीसीतील महिला कामगार असुरक्षित
Comments