HOME   व्हिडिओ न्यूज

भारिपच्या नोकर भरतीत ६० जणांना संधी

आधी मेळावा नंतर एजन्सीकडून परिक्षा, ८०० जणांची उपस्थिती


लातूर: लातुरच्या भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकर भरतीत ६० जणांना बॅंकात काम करण्याची संधी मिळणार आहे. भारिप आणि आघाडीने घेतलेला हा दुसरा नोकर भरती मेळावा होता. या आधी २० विद्यार्थी बॅंक परिक्षेत उत्तीर्ण झाले होते. आज भारिप बहुजन महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून कॉक्सीट महाविद्यालयात नोकर भरती मेळावा घेण्यात आला. त्याला ८०० उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातून ३०० जण निवडले गेले. त्यांच्या परिक्षेतून ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परिक्षा बॅंकांनी नेमलेल्या एजन्सीमार्फत घेण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.


Comments

Top