HOME   व्हिडिओ न्यूज

एसबीआयचे एटीएम निरंक, सणासुदीत शिमगा

ग्राहक फिरताहेत या एटीएम मधून त्या एटीएमध्ये, सगळीकडेच नन्ना!


लातूर: अनेक बॅंकांचं विलीकरण होऊन मजबूत झालेल्या एसबीआय बॅंकेला सेवा नीट देता येत नाही. अनेक बॅंका विलीन झाल्या, लाखो ग्राहक नव्याने मिळाले पण कर्मचारी तेवढेच आहेत. खिडक्या तेवढ्याच आहेत. एटीएम तेवढेच आहेत. कर्मचार्‍यांवर ताण येतो. ग्राहकांना मनस्ताप सह्न करावा लागतो. पैसे हस्तांतरीत करणे कठीण होते. एकूणच नव्या धोरणाने सगळ्यांची फजिती करायचं ठरवलंय की काय अशी शंका तयार होते. एकतर ग्राहकांनी बँकेतच येऊ नये आणि आले तर बॅंकांच्या नव्या नियमांच्या सुरीखाली मान झुकवावी असा बेत असावा अशी शंका येते. ऐन दिवाळीत बहुतांश एटीएममध्ये खडखडाट होता. आजही हीच स्थिती पहायला मिळाली. अशोक हॉटेल चौकापासून एसबीआयच्या शाहू महाविद्यालयाच्या जवळच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्येही पैसे नव्हते. मुख्य शाखेबाहेरील एटीएममध्ये पैसे नसतात एवढा आदर्श हीच बॅंक कमावू शकते! या प्रकरणी एसबीआयच्या एका अधिकार्‍याशी बोलणे झाले, ते म्हणतात असे शक्यच नाही. हे खरे असेल तर एटीएममध्ये पैसे लवकरच भरले जातील!


Comments

Top