लातूर: कामगार्कर्मचार्यांच्या देशव्यापी संपात लातूर जिल्ह्यातील टपाल कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या कर्मचार्यांनी गांधी चौक पोलिस ठाण्याजवळील मुख्य टपाल कार्यालयासमोर काम बंद ठेवत निदर्शने केली. घोषणा दिल्या. जिल्हाभरातील कर्मचारी यात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. जुनी पेन्शन योजना सुरु करावी, कंत्राटी पद्धत बंद करुन सर्वांना नियमित सेवेत घ्यावं, जीडीएस कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, १८० दिवसांची पगारी रजा द्यावी, बदलीच्या नियमात सुधारणा करण्यात यावी, ग्रुप विम्याची रक्कम पाच लाख करण्यात यावी अशा अनेक प्रलंबित मागण्या या कर्मचार्यांनी मांडल्या. ऑल इंडिया पोस्टल युनियनचे नेते दिनकर शिंदे, मोहन सोनटक्के, व्हीपीबिराजदार, पीएम सूर्यवंशी, दत्ता माने यांनी यात पुढाकार घेतला होता.
Comments