HOME   व्हिडिओ न्यूज

वंचितची बहुजन आघाडीची ताकद कळाली!

लातुरात संमिश्र प्रतिसाद, कॉंग्रेस आता शिवसेनेची बी टीम!


लातूर: सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात सबंध देशात रान उठलंय. कुठे बंद, कुठे उपोषण तर कुठे मोर्चेही निघाले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. अकोला, अमरावती, सोलापूर, मुंबईत काही ठिकाणी हिंसक वळणही मिळाले. पण लातुरात सहिष्णुता दिसली. अर्धा बाजार बंद राहिला. दिवसभर बंद राहिला. अर्धा बाजार बंद झालाच नाही. कार्यकर्त्यांनी जागोजागी जाऊन बंदचे आवाहन केले. त्याला लोकांनी प्रतिसादही दिला. कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यातही घेतले होते. दुपारपर्यंत सगळे वातावरण निवळले होते.


Comments

Top