HOME   व्हिडिओ न्यूज

शिवरायांच्या विश्व विक्रमी रांगोळीचे रेखाटन सुरु

अडीच एकरावर ४६ कलावंतांची मेहेनत, ५० हजार किलो रांगोळी


लातूर: यंदाच्या शिवजयंतीनिमित्त लातुरात एक विश्व विक्रम होणार आहे. क्रीडा संकुलाच्या अडीच एकर जागेवर अर्थात एक लाख स्क्वेअर फूट जागेवर छत्रपती शिवरायांची अति विशाल रांगोळी आकाराला येत आहे. सिंहासनाधिष्ठीत शिवरायांची ही रांगोळीतून साकारली जाणारी प्रतिमा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय बनली आहे. कलावंत महेश निपाणीकर आणि त्यांचे २५ विद्यार्थी शिवाय २० स्वयंसेवक या कामात गुंतले आहेत. ही रांगोळी सलग न थांबता काढली तर किमान ९० तास लागतील अशी माहिती निपाणीकर यांनी दिली.
दुसर्‍या कलावंत शुभदा पंडीत खास या रांगोळीसाठी पुण्याहून आल्या आहेत. या रांगोळीचा विक्रम जागतिक पातळीवर नोंदला जाणार आहे. अशा कलाकृतीसाठी काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे असं शुभदा सांगतात. तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण होईल. जास्तीत जास्त लोकांनी ही रांगोळी पहावी असे आवाहन पंडीत यांनी केले आहे.


Comments

Top