HOME   व्हिडिओ न्यूज

कचरा डेपोचे कुलूप काढले कुणी? आयुक्तांवर गुन्हा दाखल करु

प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प, शेतकर्‍यांची गळचेपी, आंदोलन उभे करु- सरपंच महादेव ढमाले


लातूर: कचर्‍याचा ढीग ९० फुटांचा कुंपण मात्र १० फुटांचे, सगळ्या शेतात कचरा, पाणी दूषित, पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर, घाणीचं साम्राज्य, विजेचा पत्ता नाही...अशा अनंत अडचणीतून जीव मुठीत धरुन जगणार्‍या वरवंटी, नांदगाव आणि बाजुच्या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा प्रश्न मांडले पण त्याला दाद मिळत नाही. परिणामी वरवंटीच्या कचरा डेपोला कुलूप घालण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांविरुद्ध तक्रार देण्यात आली. आज मात्र कुलूप उघडले गेले, सगळा व्यवहार सुरळीत झाला. अन्याय सहन करणार्‍या शेतकर्‍यांवरच मनपा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करते आम्ही आयुक्तांवर गुन्हा दाखल केला तर चालेल का? असा प्रश्न नांदगावचे सरपंच महादेव ढमाले यांनी केला आहे. कचरा डेपोतील चुकीच्या गोष्टींना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना टार्गेट केले जाते, त्यांच्यावर खोटे आरोप करुन अडचणीत आणलं जातं हा बनाव आहे असा आरोप ढमाले यांनी केला. प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प राहिल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. यापुढे शेतकर्‍यांना त्रास झाल्यास मोठे आंदोलन उभे करु असा इशाराही ढमाले यांनी दिला आहे.


Comments

Top