HOME   व्हिडिओ न्यूज

कर वसुलीसाठी बॅंकेनं मनपाला दिली व्हॅन भेट!

गाडी जाणार घरोघरी, डोअर टू डोअर, करणार वसुली


लातूर: लातूर महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर कर वसुली थकीत आहे. ही वसुली अधिकाधिक व्हावी यासाठी एचडीएफसी बॅंकेनं मनपाला मारुती व्हॅन भेट दिली आहे. आयुक्तांनी ही गाडी स्विकारली असून अधिकाधिक कर भरणा करावा असे आवाहन केले आहे. मनपाचे सगळ्या प्रकारचे कर विविध माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तशी सर्व प्रकारची यंत्रणा आणि उपकरणे या गाडीत उपलब्ध आहे. ही कार घरोघरी- डोअर टू डोअर जाणार आहे. बॅंकेने विनामूल्य हे वाहन दिल्याबद्दल आयुक्तांनी आभार मानले आहेत. यावेळी व्यवस्थापक विशाल जाधव, संदेश काबरा, किरण साबळे, बाळकृष्ण दरड, चिन्मय होळकुंदे, राहूल बनकर, शैलेश गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, युनूस मोमीन, रवीशंकर जाधव, दीपा गिते, राजा मनियार, अहमदखां पठाण, सचिन बंडापल्ले, शीतल मालू उपस्थित होते.


Comments

Top