HOME   व्हिडिओ न्यूज

तीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो


लातूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरच्या रेल्वेस्थानकावर तीन दिवस लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या तंत्रातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला. याशिवाय या कार्यक्रमातून लेजर तंत्रज्ञान काय आहे याची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. तीन दिवस संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हा शो चालला. सर्वच रेल्वे कर्मचार्‍यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले. यावेळी रेल्वे कर्मचारी संतोष मांदळे, गोविंद ढगे, अविनाश बनसोडे, धीरज इंगळे, सीएम भालेराव, राहूल गायकवाड, आनंद पाचपिंडे उपस्थित होते.


Comments

Top