HOME   व्हिडिओ न्यूज

शेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

मुदत संपलेल्या रिक्षा बंद करा, परवाना सक्तीचा करा, कल्याण मंडळाची स्थापना करा


लातूर: आज लातुरात गंजगोलाईतून जिल्हाधिकारी कार्यालयावर परवानाधारक रिक्षा संघटनेने धडक मोर्चा काढला. शहरातील सर्व परवानाधारक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अ‍ॅटोमध्ये सांऊड सिस्टीम, वेगवेगळी आरसे, जातीयवादी लिखाण असे प्रकार स्थानिक प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले तरी या प्रशासनाने कारवाई केली नाही म्हणून हा मोर्चा काढावा लागला असे रिक्षा संघटनेचे म्हणणे आहे. १५ वर्षांपर्यंतच कोणत्याही वाहनाचे आयुष्य असते पण लातूरमध्ये स्क्रॅप झालेल्या रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते आहे. अ‍ॅटोरिक्षाचा विमा हा कमीत कमी ०१ हजार इतका करावा. अ‍ॅटोरिक्षासाठी घोषणा केलेल्या कल्याणकारी मंडळाची स्थापना त्वरीत करावी आणि त्याची लवकरात लवकर अमलबजावणी करावी. २०१८ या वर्षात परवाण्यासाठी घेण्यात आलेले १० हजार रुपये माफ करण्यात यावेत. लातूर जिल्ह्यातील खाजगी अ‍ॅटोरिक्षा आणि स्क्रॅप रिक्षामधून प्रवासी वाहतूक करणार्‍या चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. शहरामध्ये नवीन रिक्षा थांबे तयार करून त्यास रेलींग बसवून देण्यात यावेत. शहरात नवीन एलपीजी गॅस पंप निर्माण करण्यात यावेत. शहरी परवाने आणि ग्रामीण रिक्षांची नोदणी वेगवेगळी करावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या मागण्या १५ दिवसात मान्य नाही झाल्यास परवानाधारक रिक्षा बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदवला जाईल असे सुर्यकांत संगापूडे म्हणाले. यावेळी सुरेश शिंदे, मच्छिंद्र कांबळे, अनवर पठाण, हसन शेख, व्यंकट सुरवसे, सतिश कनके, रघुनाथ सपकाळ, बालाजी तुपे, पांडुरंग सगर हरी गायकवाड, किशोर फोलाने, मुजीब शेख, नितीन क्षिरसागर चंद्रकांत लकडे दत्ता बनसोडे, हसन पठाण, अनवर शेख, बालाजी भोसले उपस्थित होते.


Comments

Top