Latestnews

जिल्हा परिषदेतही पक्षांतरबंदी, विधेयक मंजूर

2016-12-17 13:38:47 6216 Views 0 Comments

नागपूर: जिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर पक्ष बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. असे केल्यास सदस्यत्व तर रद्द होईलच शिवाय पुढच्या सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं जाईल आणि या काळात कसलंही लाभाचं पद मिळणार नाही. याबाबतचं एक विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं. जिल्हा परिषदात चालणारा घोडेबाजार या नव्या विधेयकामुळं नियंत्रणात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेने या विधेयकाला मंजुरी दिली होती. आज विधानसभेनं दिली. हे मंजूर विधेयक राज्यपालांकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात येणार आहे. अलिकडे जिल्हा परिषदातून सदस्य फोडाफोडी केली जात होती. आमिषापोटी सदस्यही पक्ष बदलत असत. नव्या निर्णयामुळे आता असे करणे शक्य होणार नाही.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी