Latestnews

आधीच्या सरकारने माझ्यासाठी खूप चांगली कामे बाकी ठेवली- पंतप्रधान

24-12-2016 : 08:34:16 6382 Views 0 Comments

मुंबई: या आधीच्या सरकारने आपल्यासाठी खूप चांगली कामे बाकी ठेवली आहेत. देशातल्या विकारांवर या आधीच्या सरकारने वेळीच इलाज केला असता तर इमानदार नागरिकांवर रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती. नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर इमानदारांना चांगले दिवस येतील, बेइमानांचा त्रास वाढेल, ५० दिवसांनंतरही काळ्या पैशाच्या विरोधातील लढाई सुरुच राहील असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि पुणे येथे बोलताना सांगितले. शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान आले होते. भूमीपूजनानंतर ते बोलत होते. छत्रपती शिवरायांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. बॅंकांना घोळात घेऊन अनेकांनी काळ्याचं पांढरं केलं. आता सारं काही संपलं असं त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. इथून तर सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवरायांसारखं व्यक्तीमत्व आता होणे शक्य नाही. शिवरायांनी सुशासन आणि प्रशासन शिकवलं. प्रचंड संकटातून शिवशाही स्थापन केली.
पुण्यात मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गिरीश महाजन, शरद पवार उपस्थित होते. शहरांचा विकास करताना गावांचा आत्मा हरवणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शहरासारख्याच सुविधा गावांनाही मिळायला हव्यात. आगामी काळात शहरांना लागणारे पाणी, शाळा, मुलभूत सुविधा याचा विचार आताच करावा लागेल. आधीच्या सरकारने माझ्यासाठी अनेक चांगली चांगली कामे बाकी ठेवली आहेत. या आधीच्या सरकारने देशाच्या विकारांवर वेळीच इलाज केला असतात तर आज निष्पाप नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज पडली नसती, महाराष्ट्राची गाडी मोठ्या खड्ड्यात फसली होती. ती बाहेर काढण्यासाठी दिल्ली आणि मुंबईच्या डबल इंजिनाची गरज होती, ते आता मिळालं आहे असंही ते म्हणाले.
काल एका माजी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचे भूमीपूजन केलं. त्याने काय झालं? काहीच होणार नाही. लहानपणी लाल किल्ल्यासमोर मीसुध्दा पंतप्रधानांसारखं भाषण केलं होतं. त्यामुळे मी पंतप्रधान झालो का? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी