Latestnews

अखिलेश यादव सपाचे प्रमुख, अमर सिंह पक्षाबाहेर!

2017-01-01 13:45:52 7037 Views 0 Comments

लखनौ: उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीतल्या नाटकाने नवे वळण घेतले आहे. आज बर्‍याच घडामोडींनंतर अखिलेश यादवांना पक्षाचं प्रमुखपद बहाल करण्यात आलं. अमर सिंह यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले असून शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर करण्यात आले आहे. अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांना आधी पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. काल पक्षाने घूमजाव करुन या दोघांनाही पुन्हा पक्षात घेण्यात आले. आज तातडीने समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात सर्वसंमतीने पक्षाची जबाबदारी अखिलेश यांच्यावर टाकण्यात आली. मुलायम सिंह यादव यांच्यावर पक्षाच्या मार्गदर्शकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. दरम्यान अकीलेश यांची ही निवड असंवैधानिक असल्याचा दावा मुलायम सिंह यादव यांनी केला आहे. नेताजी मुलायमसिंह यादव यांचा मी आदर करतो, करीत राहीन, जो कुणी त्यांच्या विरोधात काम करेल त्याला सोडणार नाही. मला माझं घर वाचवायचंय, पक्षही वाचवायचा आहे. यासाठी कुठलीही जबाबदारी उचलण्यास आपण तयार आहोत असं अखिलेश यांनी सांगितलं.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी