Latestnews

पाच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मोदींची परिक्षा

2017-01-04 22:09:42 6656 Views 0 Comments

नवी दिल्ली: उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ११ जानेवारी ते ०८ मार्च या काळात या निवडणुका पार पडणार आहेत. ११ मार्च रोजी या पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे. आजपासूनच या सगळ्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पाच राज्यात ६९० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दिव्यांगांसाठी मतदन केंद्रांवर विशेष सोय केली जाणार आहे. काहे ठिकाणी गरजेनुसार स्वतंत्र महिला मतदान केंद्रेही उभारली जाणार आहेत. ११ जानेवारी ते ११ मार्च अशी दोन महिने ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. गोवा अणि पंजाबमध्ये ०४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तराखंडात १५ फेब्रुवारीला तर उत्तरप्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात ४०३, उत्तराखंडात ७०, पंजाबात ११७, गोव्यात ४० तर मणिपुरात ६० जागांसाठी मतदान होणर आहे. या निवडणुकात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपा पक्षाची खरी परिक्षा होणार आहे. मोदींच्या आजवरच्या निर्णयाचे खरे पडसाद या निवडणुकात पहायला मिळतील.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी