Latestnews

तीन दिवस शाळा, सरकारी कार्यालये अन मंत्रालयही राहणार बंद!

2017-06-16 7:26:16 1315 Views 0 Comments

मुंबई: राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी संपाचं हत्यार उपसल्यानं पुढच्या महिन्यात १२, १३ आणि १४ तारखेला राज्यभरातल्या शाळा, सरकारी कार्यालये आणि मंत्रालयही ठप्प पडणार आहे. सातवा वेतन आयोग लागू होऊन दीड वर्ष लोटलं पण अमलबजावणी होत नसल्याने राज्य कर्मचारी आक्रम्क झाले आहेत. या कर्मचार्‍यांनी तीन दिवसांच्या संपाची नोटीस राज्यातील सगळे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनाही दिली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय वाढविणे आणि महिलांना बालसंगोपन रजा देणे या मागण्या राज्य कर्मचार्‍यांनी मांडल्या आहेत. त्या मान्य न झाल्यास सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांचंही कामकाज चालणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. या संपात राज्य सरकारचे कर्मचारी, सर्व खात्यांचे अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. ०१ जानेवारीला लागू झालेला सातवा आयोग अमलात येत नसल्याने राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी मागच्या जानेवारी महिन्यात १८ ते २० या काळात संपाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने त्यांची समज काढली होती. पण पुढे काहीच झाले नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर राज्य कर्मचार्‍यांच्या या आंदोलनाला महत्व आले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी