Latestnews

दही हंडीच्या उंचीवरील निर्बंध हटले, नियम सरकार ठरवणार

2017-08-07 16:34:01 424 Views 0 Comments

मुंबई: दही हंडीच्या मनोर्‍यांच्या उंचीसह सगळे निर्बंध उच्च न्यायालयाने हटवले आहेत. त्याचसोबत या खेळात १४ वर्षांखालील मुले सहभागी होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. दही हंडीची उंची वाढत आहे, त्यात अपघात होत आहेत, लहान मुलांना त्याचा त्रास होतो आहे या आशयाची याचिका सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दाखल केली होती. या घटनाक्रमामुळं गोविंदा पथकातून मात्र आनंद व्यक्त होत आहे. दही हंडीतील सहभागींना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड द्यावेत, सगळ्यांच्या नावांच्या नोंदी ठेवावाव्यात असे उपाय राज्य सरकारने सुचवले आहेत. १८ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी करू नये व मानवी मनोऱ्याची उंची वीस फुटांपेक्षा जास्त असू नये असे निर्बंध न्यायालयाने घातले होते. दहीहंडीचा खेळ सांस्कृतिक आहे. यातील अधिकाधिक उंच थर हा यातील धाडसाचा भाग आहे. चीन आणि स्पेनमध्येही असे खेळ खेळले जातात असा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. आता या खेळातील सगळे नियम सरकारनेच करावेत अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी