Latestnews

गांधी हत्येचा फेरतपास, बाळाला मारण्याची धमकी आईवर बलात्कार, ब्लू व्हेलमधून वाचवा हो, देशव्यापी चक्का जाम, आता टार्गेट ‘हलाल’.....०७ ऑक्टोबर १७

07-10-2017 : 02:30:43 1915 Views 0 Comments

* लातुरात शेअर रिक्षाचे भाडे प्रति व्यक्ती किमान १० रुपये, लांब पल्ल्याला १५ रुपये
* लातूर मनपाच्या करवाढीच्या विरोधात माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, मनोहरराव गोमारे, वैजनाथ शिंदे, त्र्यंबकदास झंवर, उदय गवारे यांनी केले धरणे आंदोलन
* बेद्रे, गोमारे, गवारेंच्या धरणे आंदोलनास महापौर पवार आणि उप महापौर देवीदास काळे यांनी दिली भेट, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन
* सरकारने जनतेचा अंत पाहू नये, उद्धव ठाकरे यांचे आवाहन
* दिवाळीत त्रास देणार नाही ही सोदी सरकारची मोठी भेट- उद्धव ठाकरे
* केंद्र सरकारनं सर्वसामान्यांची लक्ष्मी ओरबाडून घेतली- उद्धव ठाकरे
* चांगल्या कामचे कौतुकच करतो म्हणून तर वाईट गोष्टींवर टीका करण्याचा मला अधिकार- उद्धव ठाकरे
* लातूर जिल्हा परिषदेच्या मालमत्ता बीओटी तत्वावर द्या, भाडे वसुली करा- रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
* कातपूर रोड येथे झालेल्या विवाहितेच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपी आले शरण, दोन दिवसंची पोलिस कोठडी
* लातूर जिल्ह्यात ३३४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
* लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर, भाव वाढेल म्हणून सांभाळून ठेवलेल्या सोयाबीनचाही समावेश
* औसा हनुमान कट्ट्याला महापौरांनी दिले दोन फोकस एक जळाला, कट्ट्याला उत्तम प्रतिसाद
* भारत-ऑस्ट्रेलियाचा आज पहिला टी २० सामना
* नरंद्र मोदींचा तीस दिवसात आज तिसरा गुजरात दौरा
* राज्यातील १८ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६००० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु, पहिल्यांदाच जनतेतून सरपंचांची निवड
* ग्रामीण भागातील भाअनियमन कायम राहणार
* परतीच्या पावसाचे राज्यात ११ बळी
* महात्मा गांधी यांच्या हत्येचा फेरतपास होण्यास होण्याची शक्यता, चौथ्या गोळीचं प्रकरण
* मराठवाड्यातील १८५४ ग्रामपंचायतींसाठी आज शनिवारी मतदान
* ज्येष्ठ गायिका बेगम अख्तर यांची आज जयंती
* मुंबईतील रेल्वेस्थानकाच्या पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई, पूल मोकळे
* पत्रकर गौरी लंकेश यांची हत्या, सनातन रडारवर
* राज्य सरकारच्या अध्यादेशानंतरही महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा बंद सुरूच ठेवण्याचा निर्धार
* नाशिकमध्ये बाळाला मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार
* ब्लू व्हेल गेमच्या तीन स्टेज पार केल्या, मला वाचवा, बिसाऊतील विद्यार्थाची विनवणी
* इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची अंतिम फेरी ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार
* पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
* नोटाबंदी काळात सर्वाधिक उघडली गेली बचत खाती
* ग्रामसेवकांना मारहाणीच्या घटनांत वाढ, ग्रामसभांना पोलीस संरक्षण देण्याची ग्रामसेवक युनियनची मागणी
* जीएसटी, इंधन दरवाढीविरोधात देशातील मालवाहतूकदारांचा सोमवारपासून चक्काजाम
* यवतमाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पोस्टरला काळे फासून पोस्टर फाडले
* फिफा वर्ल्डकप: अमेरिकेची भारतावर मात
* मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढवण्याचा निर्णय
* ३०० कोटींच्या प्रकरणात राणेंविरोधातील चौकशी थांबली, जनहित याचिका दाखल
* छोट्या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा, रिटर्नसाठी तीन महिन्यांचा कालावधी, ५० हजारांपर्यंतच्या खरेदीला पॅन कार्डची गरज नाही
* जीएसटीमुळे दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट
* पावसामुळे कोळसा काढण्यात अडचणी, आणखी १० ते १२ दिवस वीजसंकट कायम राहणार- उर्जामंत्री
* कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात वीज संकट, मुंबई वगळता राज्यात २ हजार मेगावॅटचे भारनियमन
* यवतमाळमध्ये कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांनी फेकली कापसाची रोपं, बाजू ऐकून न घेतल्याने शेतकऱ्यांचा संताप
* बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक आणि माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचा अर्ज
* हडपसर येथील बनावट सिमेंट तयार करणारा अड्डा संघटित गुन्हेगारी पथकाने केला उध्वस्त केला
* नाशिकात भारनियमनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, वीज वितरण कार्यालया बाहेर भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी
* नाशिकात ‘हलाल’ चित्रपटासाठी शहरात थिएटरच्या बाहेर पोलीस बंदोबस्त
* व्हीके शशिकला यांना ०५ दिवसांचा पॅरोल बेंगळुरू सेंट्रल जेलमधून सुटका
* खासगी उद्योगांना फायदा मिळावा यासाठी जाणिवपूर्वक भारनियमन केलेः नवाब मलिक यांचा आरोप
* जपानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप
* 'ओला' टॅक्सीमध्ये महिलेची प्रसुती; ०५ वर्षे मोफत प्रवास
* नागपूरच्या शिवनगावातील प्रकल्पग्रस्तांचे 'किडनी विकणे आहे' आंदोलन
* नागपुरात नरभक्षक वाघीणीला ठार मारण्याचा आदेश अखेर वन विभागाने घेतला मागे
* मुंबईतील महिलेवर नाशिकच्या संदीप हॉटेलमध्ये बलात्कार. शिर्डीला जाण्यासाठी आली होती महिला
* लोडशेडिंग बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांची औरंगाबाद महावितरणच्या कार्यालयावर धडक
* परभणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
* बनवारीलाल पुरोहित यांनी घेतली तामिळनाडूच्या राज्यपालपदाची शपथ
* फिफा वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यताः गुप्तचर यंत्रणेचा इशारा
* दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात दलित रस्त्यांवर, गुजरातमध्ये 'गोहत्या पाप आहे तर 'दलित हत्या माफ आहे', असे फडकावले फलक
* उत्तर प्रदेशात डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, भागवत यांना कोणतीही दुखापत नाही
* अरुणाचल प्रदेशमध्ये ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप.
* वाहनकर्ज स्वस्त होणार
* हरियाणा पोलिसाला रामरहीमची हार्ड डिस्क मिळाली. हार्ड डिस्कमध्ये ७०० कोटींच्या देवाणघेवाणसंबंधी पुरावे

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी