Latestnews

Updated.... मोदींना लग्नाची मागणी, राणेंना भाजपावाले सडवतील, अदानीविरोधात ऑस्ट्रेलियात आंदोलन, फाणवीसांना रआष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा.....०८ ऑक्टोबर २०१७

08-10-2017 : 09:36:15 2075 Views 0 Comments

* नरेंद्र मोदींसोबत लग्न करण्यासाठी ओम शांती शर्मा नामक महिलेचे जंतरमंतरवर महिनाभरापासून धरणे आंदोलन
* औषधी फवारणार्‍या शेतकर्‍यांचा मृत्यू, विषारी रसायनांबरोबरच चायनामेड पंपांचाही दोष
* महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली नांदेडात सभा
* मुलींना छेडणार्‍यांना जागीच चोपा, कोपर्डी-निर्भया घडणार नाही- उद्धव ठाकरे
* मेणबत्त्या कसल्या जाळता? अन्याय करणार्‍यांना जाळा- उद्धव ठाकरे
* फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर चालत आहे- उद्धव ठाकरे
* कीटकनाशक फवारणीवेळी विषबाधेतून २२ शेतकऱ्यांचा मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा- धनंजय मुंडे
* मोहन जोशी यांना विष्णूदास भावे पुरस्कार
* रिझर्व बॅंकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांना नोबेल मिळण्याची शक्यता
* अदानीच्या ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीविरुद्ध आंदोलन तीव्र
* कॉंग्रेसने सडवले, आता भाजपावाले सडवतील, नारायण राणे यांना सुभाष देसाई यांचा इशारा
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला वडनगरात रोड शो, शाळेतल्या मातीचा लावला कपाळाला टिळा
* रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासहेब पाटील यांच्या हस्ते सोमवारी बॉयलर प्रदीपन
* लातुरच्या शाम मंगल कार्यालयात आज लिंगायत समाजाचा वधू-वर सूचक मेळावा
* डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा ०९ ऑक्टोबर रोजी कोरे गार्डन लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सत्संग सोहळा प्रकृती अस्वास्थामुळे स्थगित
* हिंदू खाटीक समाजभूषण डॉ. संतुज़ी रामजी लाड़ यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातुरात झाले रक्तदान
* जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांचे पुन्हा जानेवारी अखेरीस दिल्लीत उपोषण
* लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध
* मराठवाड्यात परतीच्या पावसात विजेचे १० बळी, दोन दिवसांत २४ ठार
* पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे आजारपणामुळे निधन, आज कासार पिंपळगाव येथे दुपारी ०४ वाजता अंत्यसंस्कार
* मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या बोनसचा तिढा सरकारच्या हस्तक्षेपामुळे कायम
* सात दिवसात वीज पुरवठा करु नियमित, गरज पडली तर रस्त्याने कोळशाची वाहतूक - मुख्यमंत्री
* लोकपाल आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे करणार नव्याने आंदोलन, नव्या टीमची बांधणी सुरु
* गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेले ‘लोडशेडींग’ शनिवारी काही प्रमाणात कमी
* पहिल्या टी २० सामन्यात भारताने केली ऑस्ट्रेलियावर मात
* पुण्यातील विक्री केंद्रावरील निराची तपासणी सुरु
* नागपुरात गळा चिरुन चेहऱ्याचे मास काढून हत्या करणारा मारेकरी गुरुदयाल पाठक याला अटक
* सरकार आर्थिक धोरणात नापास, भारतीय मजदूर संघाचा आरोप
* औरंगाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान
* अदानीच्या ‘अदानी एण्टरप्राइझेस’ या सर्वात मोठा कोळसा खाणी विरोधात ऑस्ट्रेलियात निदर्शने
* पुण्यात ४६ वर्षाच्या मॅरेथॉन धावपटूचे ब्रेनडेड झाल्यामुळे एका पोलिसाच्या २२ वर्षाच्या मुलाला हृदय तर अन्य दोघांना मूत्रपिंड, आणखी एकाला यकृत मिळाल्याने नवजीवन
* दिवाळीपूर्वी कर्जमाफी अशक्य- परिवहन मंत्री दिवाकर रावते
* शिर्डीत सोयाबीन काढणार्‍या चौघींवर कोसाळली वीज, शेतमजूर महिला ठार, तिघी होरपळल्या
* डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित होणार
* कीटकनाशकांमुळे २५ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकारला आली जाग, नोंदणी नसलेल्या कीटकनाशक आणि खतावर राज्यात विक्रीस बंदी
* कॉंग्रेसमुळे नांदेड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश नाही- रावसाहेब दानवे
* अजिंक्य रहाणे ऐवजी शिखर धवन आणि अक्षर पटेलच्या जागी कुलदीपचा संघात समावेश. आशीष नेहराही संघात नाही
* राणे तुमच्याकडे येत आहेत, भाजपावाल्यांनो कोंबड्या सांभाळा- शिवसेनेचे सुभाष देसाई
* भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचे मंत्रालयाबाहेर आंदोलन, खा. सुप्रिया सुळे, चित्रा वाघ आंदोलनात. कर्नाटक, गुजरातमध्ये भारनियमन नाही, मग महाराष्ट्रात का?
* ठाण्यात १० कोटींच्या वसुली प्रकरणी रवी पुजारी गँगच्या दोन शार्प शूटर्सना अटक
* तेल कंपन्या आणि सरकारच्या मनमानीविरोधात देशभरातील पेट्रोल पंपांचा १३ ऑक्टोबरला संप
* लव जिहाद प्रकरणी केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र
* हैदराबादेत गृहमंत्र्यांच्या केबिनबाहेर एका महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
* केंद्राने जीएसटीबाबत केलेली घोषणा ही सरकारची भेट नाही तर नाईलाज आहे: उद्धव ठाकरे
* पुण्यात दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याच्या प्रयत्नातील ६५ वर्षीय वृद्धाला १८.५० लाखांचा गंडा; 'जीवनसाथी डॉट कॉम'वरील प्रोफाइल वरून संपर्क करत महिलेने घातला गंडा
* औरंगाबादेत जीएसटी आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात ट्रान्सपोर्ट चालकांचा ९ व १० ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलन
* प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन; 'जाने भी दो यारो' चित्रपट, वागले की दुनिया, नुक्कड आदी मालिकांचे केले होते दिग्दर्शन
* जीएसटीमध्ये केलेल्या बदलामुळे १५ दिवस आधीच दिवाळीचे वातावरण: पंतप्रधान मोदी
* मुंबई: बूचर आयलंडवरील तेलटाक्यांना आग आटोक्यात आणण्यास आणखी १५ तास लागण्याची शक्यता; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू
* जबलपुरात सहा वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याने केला बलात्कार; बलात्कारानंतर चिमुरडीची केली हत्या
* हरयाणाच्या गुडगाव मानेसर येथील मारुती कार कंपनीत बिबट्या शिरला, सच्चा डेरात का नाही शिरला, संतप्तांचा सवाल
* नोटाबंदीनंतरचे ४५५२ कोटींचे व्यवहार संशयास्पद

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी