HOME   महत्वाच्या घडामोडी

पवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी वारी करावी, ४२५ आंदोलकांवर गुन्हे.......३० जुलै १८


पवार घटना दुरुस्ती कशी करणार, बसवेश्वर संस्थेची निवडणूक, एक तरी वारी करावी, ४२५ आंदोलकांवर गुन्हे.......३० जुलै १८

* महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत शिवशंकर बिडवे यांच्या पॅनलचे आठही उमेदवार विजयी
* बसवेश्वर शिक्षण संस्थेची निवडणूक पार पडली धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली
* मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने तातडीने अहवाल द्यावा- मुख्यमंत्री
* अहवालानंतर तातडीने एक दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन भरवले जाईल- मुख्यमंत्री
* मराठा आरक्षणाबाबत उद्या शिवसेनेची बैठक
* आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी- पंतप्रधान
* मराठा आंदोलकांचे १२ दिवसापासून परळीत ठिय्या आंदोलन सुरु
* शरद पवार घटना दुरुस्ती कशी करणार त्याचा खुलासा करा- प्रकाश आंबेडकर
* ०५ ऑगस्ट्ला पुण्यात बैठक, आदिवासीत समावेश करा
* मराठा आरक्षणासाठी आज सोलापूर बंद
* मुजफ्फरनगमध्ये ३४ पैकी ३२ मुलींचे लैंगिक शोषण
* ०२ ऑक्टोबरपासून राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठी आंदोलन
* आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आमदारांच्या स्वतंत्र बैठका
* मुंबई: 'एअर डेक्कन' विमान कंपनीकडून महाराष्ट्रातील ६ शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू
* मुंबई: ज्येष्ठ मच्छिमार नेते रामचंद्र पाटील यांचे निधन
* अंधेरी पूल दुर्घटना: जखमी मनोज मेहता यांचा उपचारादरम्यान मृत्यू
* चेन्नई: डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा
* चेन्नई: कावेरी हॉस्पिटलसमोर डीएमकेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
* चेन्नई: डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ; कुटुंबीय रुग्णालयात तातडीने पोहोचले
* नवी दिल्ली: ‘ट्राय’ अध्यक्षांचा डेटा हॅक झालाच नाही; UIDAIचा दावा
* झारखंड: सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार
* परभणी: मराठा क्रांती मोर्चातील ४२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल
* पोलादपूर दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून प्रत्येकी १ लाखांची मदत जाहीर
* मुंबई: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सोमवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
* पुणे: पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार
* कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी दिल्ली हादरवणार; खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा
* डोंबिवली: नोकरीच्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या
* राजस्थान: ट्रॅक्टरची स्पर्धा पाहताना इमारतीचा भाग कोसळला; ३०० लोक जखमी, ५० गंभीर
* उत्तर प्रदेश: मोरादाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना
* मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यां* नी सोमवारी बोलावली आमदारांची बैठक
* नाशिक: वंचितांच्या बहुजन आघाडी संवाद यात्रेतील प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी गर्दी
* 'उद्योजकांचा चोर म्हणून अपमान करायचा का?' (टॅप करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
* ओडिशा: नक्षलवाद्यांच्या म्होरक्या पत्नीसह पोलिसांना शरण
* पुणे: खडकवासला धरणाशेजारील चौपाटी दर रविवारी राहणार बंद; सुट्टीच्या दिवशी वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाय
* कोल्हापूर: मराठा आंदोलकांना भेटायला आलेल्या राजू शेट्टींविरोधात 'चले जाव'च्या घोषणा
* नाशिक: १५ ऑगस्टपासून पंतप्रधान मोदींचे कपडे फाडो आंदोलन आम्ही सुरु करणार: प्रकाश आंबेडकर
* मुंबई: राजीनामे देण्यापेक्षा मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहा: मुख्यमंत्री
* मुंबई: सर्व मराठा संघटनांनी चर्चेला यावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
* मुंबई: मेगा भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही: मुख्यमंत्री
* लातूर: वारकऱ्यांना आम्ही वेठीस धरले नाही; मराठा क्रांती मोर्चाचे स्पष्टीकरण
* मुंबई: मराठा आरक्षणाचा विषयावर सरकार गांभिर्याने विचार करत आहे: मुख्यमंत्री
* मुंबई: पोलिसांवर हल्ले करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही: मुख्यमंत्री
* मुंबई: मराठा आंदोलकांनी शांतता राखावी; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
* मुंबई: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये बैठक संपली
* पाण्याचा अंदाज न आल्याने अंबरनाथच्या चिखलोली धरणात तरुण बुडाला.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनवलेली शॉर्ट फिल्म पाहण्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे जनतेला आवाहन.
* आरक्षण: पुण्यात चक्काजाम, उद्या सोलापूर बंद (टॅप करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
* कोल्हापूरः हातकणंगले सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनावेळी भेट देण्यासाठी आलेल्या खासदार राजू शेट्टी यांना आंदोलकांनी 'चले जाव'च्या घोषणा देत हाकलून लावले.
* मुंबईः मराठा आरक्षणावर उद्या दुपारी शिवसेनेची मातोश्रीवर बैठक.
* चेन्नईः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी घेतली डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची भेट.
* पुणेः सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून उद्या ३० जुलै रोजी मार्केटयार्ड बंद राहणार.
* औरंगाबाद: हज यात्रेला औरंगाबादहून १४५ जणांचा पहिला जत्था जामा मशीद येथून विमानतळाकडे रवाना.
* मुंबईः मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण बैठक सुरू, बैठकीला आंदोलकांसह मुख्यमंत्री, नारायण राणे, नितेश राणे उपस्थित.
* हिमा दासच्या कोचवर लैंगिक शोषणाचा आरोप (टॅप करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
* नाशिकः इंडस्ट्रीज, मॅन्युफ्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत दुपारपर्यंत ३० टक्के मतदान
* एक तरी वारी अनुभवावी; मोदींची 'मन की बात' (टॅप करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
* मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोलापुरात बंदची हाक.
* पुणेः मराठा आरक्षणाच्या मागणीसह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन.
* औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आसूड आंदोलन.
* मुंबईः मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार.
* पाकिस्तानः इम्रान खान १४ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणारः पीटीआय नेत्याचा दावा.
* औरंगाबाद : रोजगारांसाठी जॉब कार्ड देण्याच्या कार्यक्रमात बेरोजगारांची मोठी गर्दी.
* सबसिडीविना आणि विविध नविन कर लावल्यानंतर स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच यावर्षी १,७५,०२५ मुस्लिम हजसाठी जात आहेत. विशेष म्हणजे यात ४७ टक्के महिलांची संख्या जास्त आहेः मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री
* पोलादपूर बस दुर्घटनेत ३३ नव्हे तर ३० जणांचा मृत्यू. एक जण बचावला.
* पोलादपूर बस दुर्घटनाः ३० जणांचे मृतदेह हाती. एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचं घाटातील शोधकार्य थांबलं.
* यावर्षी इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन.
* नागपूरः मराठा समाजाच्या पुढाऱ्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याने मुख्यमंत्र्यांचा नागपूर दौरा रद्द
* पोलादपूर बस दुर्घटनाः आंबेनळी घाटातून आतापर्यंत २९ मृतदेह बाहेर काढले. शोधकार्य सुरूच.
* मुंबईः हजसाठी मुंबईतून पहिली तुकडी रवाना.
* योगेश आणि रजनीश यांनी स्मार्ट गावांसाठी बनवलेल्या अॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केले कौतुक.
* मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्ध दिवंगत कवी नीरज यांना श्रद्धांजली.
* पुणेः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी डेक्कन कॉर्नर, संभाजी महाराज पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी.
* मुंबईः मराठा आरक्षणावर आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री-आंदोलकांमध्ये चर्चा होणार. नारायण राणे हेही उपस्थित राहण्याची शक्यता.
* पुणेः डेक्कन कॉर्नर, संभाजी महाराज पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर युवकांची गर्दी. भगवे झेंडे हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी.
* पोलादपूर दुर्घटनाः आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढले. शोधकार्य सुरूच.
* व्यंगचित्रकार संदीप अध्वर्यू यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.
* पुणेः 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत मराठा समाजातील युवकांची कोथरूडमधून बाईक रॅली.
* उत्तर प्रदेशः मुसळधार पाऊस आणि विजांचा शॉक लागून ३९ जिल्ह्यात ६५ जणांचा मृत्यू. सहारनपूरमध्ये ५७ जणांचा मृत्यू.
* पोलादपूर दुर्घटनाः दापोलीतील बाजारपेठा बंद राहणार. शोधकार्य सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सकाळी ११ वाजता ४६ वी मन की बात.
* उत्तराखंडः रामपूर, बांसवारासह अनेक रस्त्यावर भूस्खलन. माती हटवण्याचं काम सुरू.
* इंडोनेशियात भूकंप, तीन जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी.
* राजस्थानः ७ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या.
* मुंबई: रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
* रायगड बस दुर्घटनाः आतापर्यंत २५ मृतदेह बाहेर काढले.
* पुणेः मदरशामध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी मौलानाला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी.
* उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज एम करुणानिधी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी चेन्नईला जाणार
* रायगड बस दुर्घटना : आतापर्यंत दरीतून २० मृतदेह बाहेर काढण्यास एनडीआरएफ आणि ट्रेकर्सला यश
* रायगड बस दुर्घटना: एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचं शोधकार्य सुरू


Comments

Top