HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय रॉकेल नाही, पतंगाला तांब्याची दोर दोन गंभीर, इम्रानचे देव-कपील-गावस्करला निमंत्रण, चर्चा नको आरक्षण द्या.....०२ ऑगस्ट १८


आ. देशमुखांच्या घरासमोर निदर्शने, चाकण प्रकरणी २० जणांना अटक, आधारशिवाय रॉकेल नाही, पतंगाला तांब्याची दोर दोन गंभीर, इम्रानचे देव-कपील-गावस्करला निमंत्रण, चर्चा नको आरक्षण द्या.....०२ ऑगस्ट १८

* बाभळगावात आ. अमित देशमुख यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने, मराठा आंदोलक आक्रमक
* लातुरात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या घरासमोर मराठा आंदोलकांची निदर्शने; सरकारविरुद्ध घोषणाबाजी
* चाकण हिंसाचारात २० जणांना अटक, नावे गुप्त
* चाकण हिंसाचारातील आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर करणार
* मराठा आरक्षण प्रकरणी आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलं मराठा प्रतिष्ठांना
* मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला कोल्हापुरच्या शाहू महाराजांनी निमंत्रण नाकारलं
* मनमाड-इंदूर नव्या रेल्वे मार्गाची घोषणा
* सांगली मनपा निवडणुकीसाठी ६७.१२ मतदान, उद्या निकाल
* आधार नोंदणीशिवाय रॉकेल मिळणार नाही
* भिवंडीत पतंग उडवताना दोर्‍याऐवजी वापरली तांब्याची तार, दोन बालके गंभीर जखमी
* पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई
* ११ ऑगस्टला इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार, आमीर खान, कपील देव-सुनील गावस्कर-मोदींना निमंत्रण
* महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राकडे करणार ७५ हजार कोटींची मागणी
* शाहरुखची मुलगी सुहाना फिल्म इंडस्ट्रीत येण्य़ास सज्ज, केलं खास फोटो सेशन
* बनावट पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर औरंगाबादेत कारवाईची प्रक्रिया सुरू
* मराठा समाजाला आरक्षण द्यावे याबाबत सरकार प्रामाणिक नाही- पृथ्वीराज चव्हाण
* भारत वि इंग्लंड पहिली कसोटी: इंग्लंडचा डाव गडगडला; ६ बाद २३७ धावा
* कोल्हापूर: चर्चा कसली करताय, आरक्षणाचा निर्णय घ्या; शाहू महाराजांनी सरकारला फटकारले
* नवी मुंबई: आरपीएफ जवानाने तुर्भे रेल्वे स्थानकात लोकलमधून पडलेल्या महिलेचे प्राण वाचवले
* नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट
* दिल्ली: वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार: सुरेश प्रभू
* औरंगाबाद: भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या अधिवेशनाला कर्णपुरा मैदानात सुरुवात
* पुणे: मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारावा: रामदास आठवले
* सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण: काँग्रेस नेते शशी थरूर यांना दिल्ली सत्र न्यायालयाची परदेशात जाण्यास सशर्त परवानगी
* औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा दशक्रिया विधी शांततेत संपन्न; गोदावरी नदीवरील 'त्या' पुलाला दिले स्व. काकासाहेब शिंदे यांचे नाव
* नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी संसदेच्या आवारात घेतली ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणींची भेट
* मराठा आरक्षण बैठकीस सह्याद्रीवर कलावंत, विचारवंत, लेखक, उद्योजकांची उपस्थिती
* उपस्थितांमध्ये आ. ह. साळुंके, सयाजी शिंदे, डॉ. अमोल कोल्हे, नितीन चंद्रकांत देसाईंचा समावेश


Comments

Top