HOME   महत्वाच्या घडामोडी

अग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची मागणी, अमेरिकेवर चीनच्या हल्ल्याची शक्यता, पूरग्रस्त केरळला ५०० कोटी......१८ ऑगस्ट २०१८

मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवाने


अग्नीशनच्या जागी शौचालय, सनी लिओनी लातुरात येणार, लातुरला स्वतंत्र विद्यापिठाची मागणी, अमेरिकेवर चीनच्या हल्ल्याची शक्यता, पूरग्रस्त केरळला ५०० कोटी......१८ ऑगस्ट २०१८

* लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद
* लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु
* मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या
* लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण
* लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम
* सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार
* लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय
* अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा
* मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर
* संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी
* ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण
* यवतमाळ जिल्ह्यत अतिवृष्टीने ९३७ घरांची पडझड
* अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यविधीवेळी तिनही दलातील ३०० जवानांनी दिली सलामी
* चीनकडून अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला होण्याची शक्यता
* आशियाई क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ
* केरळमध्ये भीषण पूर, पाहणीसाठी पंतप्रधान रवाना
* केरळला देशभरातून मदत सुरु
* पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टरने वाचवणे सुरु
* केरळला केंद्राकडून ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर
* केरळात पुरामुळे ३२४ लोकांचा मृत्यू
* केरळात भारतीय तटरक्षक दलाचे जवानही बचावकार्यात सहभागी
* राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वानवडी येथील फ्लॅटमध्ये चोरी
* ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन
* पुढील दोन दिवस कोकण, गोव्यामध्ये जोरदार आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
* खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; भिडे पूल पाण्याखाली
* पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळकडे रवाना
* मानसिक आजाराला सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण
* पाकिस्तान: इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड; बहुमत केले सिद्ध
* महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या कोट्यातील जागांसाठी राज्य सरकारने घातलेली डोमिसाईलची अट सुप्रीम कोर्टानेही ठरवली वैध
* शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन
* औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि नगरसेवक पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी रवाना
* औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर
* बांगलादेशच्या स्वातंत्र्यांसाठी अटल बिहारी वाजपेयी योगदान सदैव स्मरणात राहील- बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अबुल हसन महमूद अली
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल मुद्द्यावरची बैठक पुढे ढकलली
* नाशिकच्या मालेगावातील अजंग येथे ३६ मेंढ्या ठार; बिबट्याच्या हल्ल्याचा संशय
* औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ तर जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४५ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी
* मराठवाड्यात पावसाची दाणादाण, ४२१ महसुली मंडळांपैकी तब्बल १८९ मंडळांमध्ये अतिवृष्टी
* कर्नाटक: अनेक ठिकाणी मुसळधार आणि सततच्या पावसामुळे भूस्खलन झाल्याने मकनूरमधील कोडगु-मेंगळुरु राज्यमार्ग बंद
* नवी दिल्ली: राजनाथ सिंह, राम नाईक यांनी अटल बिहारी वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली
* मुजफ्फरपुर शेल्टर होम केस: पाटणा आणि बेगूसराय मध्ये माजी बिहार कल्याण विभाग मंत्री मंजू वर्मा यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे
* सेल्फी घेण्याचा मोह करू नये- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
* एनडीआरएफच्या ५ टीम तिरुअनंतपुरम येथे सकाळी दाखल झाल्या बचावकार्य सुरु; आणखी ३५ टीम लवकरच दाखल होणार
* माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त अमेरिकेने शोक व्यक्त केला


Comments

Top