HOME   महत्वाच्या घडामोडी

आज लातुरात पाणी नाही, अंनिसनं काढला निर्भय वॉक, लातुरात सर्वदूर पाऊस, लवकरच कौन बनेगा करोडपती, किल्लारीचा निर्णय २४ ऑगस्टला, नऊनंटर एटीएममधे नो कॅश......२० ऑगस्ट २०१८


आज लातुरात पाणी नाही, अंनिसनं काढला निर्भय वॉक, लातुरात सर्वदूर पाऊस, लवकरच कौन बनेगा करोडपती, किल्लारीचा निर्णय २४ ऑगस्टला, नऊनंटर एटीएममधे नो कॅश......२० ऑगस्ट २०१८

* दोन दिवस वीज पुरवठा बंद राहिल्याने आज लातुरकरांना पाणी नाही
* लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
* लातूर शहरातील ओपन जीमला सोरदार प्रतिसाद
* लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी तालुकानिहाय बैठका
* किल्लारी कारखाना भडेतत्वावर देण्यासाठीए २४ ऑगस्टला निर्ण्य
* आज २० ऑगस्ट शहीद दाभोलकरांचा पाचवा स्मृतीदिन
* लातुरात क्रीडा संकुलात अंनिसह अन्य कार्यकर्तांनी काढला निर्भय मॉर्निंग वॉक
* दाभोळकरांना गोळ्या घालणारा सापडला, पण सूत्रधार अजून कळेना
* संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे बंदूक चालवायला महाराष्ट्र आणि कर्नाटकात शिकला- सीबीआय
* हत्येचा मास्टरमाईंड वीरेंद्र तावडेच- सीबीआयचा दावा
* हत्येच्या मुळापर्यंत तपास करून हल्ल्याचा सूत्रधार कोण याचा शोध घेतला जावा- जयंत नारळीकर
* दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचा परस्पर संबंध, त्याचा शोध घ्यायलाच हवा- मुक्ता दाभोलकर
* मराठा आजपासून चक्री उपोषणाला सुरुवात
* अहमदनगरातील लक्ष्मी ज्वेलर्समध्ये मालकाला गोळी घाअलून सोने, चांदी लुटले
* रात्री नऊ नंतर बॅंकांना एटीएम मध्ये पैसे भरण्यास बॅंकांना मनाई
* अकाली दल स्वबळावर निवडणुका लढणार, मोदी सरकारला आणखी एक झटका
* कौन बनेगा करोडपतीचा दहावा भाग लवकरच
* नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणात आणखी एकाला अटक
* वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा वंजारी समाज आरक्षण कृती समितीचा निर्णय
* राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यक्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करणे बंधनकारक
* आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडय़ात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
* नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जालन्यात माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना अटक
* माजलगावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी एका युवतीसह अन्य दोनजण गजाआड
* माझ्या मुलीच्या भविष्यासाठी, मराठा समाजासाठी चाललो असल्याचे चिठ्ठीत लिहून अंबड तालुक्यात तरुणाची आत्महत्या
* मी चळवळीतला कार्यकर्ता असून शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन - सदाभाऊ खोत
* पाळलेला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला ०६ हजाराचा दंड सुनावला सांगली जिल्हा न्यायालयाने
* सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साताऱ्याजवळ रेल्वे गाड्यांवर सह्याद्री आणि हुबळी एक्स्प्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला
* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाली ‘एक गाव एक पोलीस’ योजना, यामुळे कायदा व सुव्यवस्था सक्षम होईल- गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
* गुजरातमध्ये आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषणाच्या तयारीत असतानाच पाटीदार आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल यांना अटक
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिद्वारमध्ये झाले विसर्जन, राजनाथ सिंह, अमित शहा, योगी आदित्यनाथ, त्रिवेंद्र सिंह होते उपस्थित
* पाठ्यपुस्तकात अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवनचरित्र देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय
* दाऊदचा निकटवर्ती फारूख टकलाने खोटी ओळखपत्रे दाखवून पासपोर्ट मिळवला- सीबीआय, फ़ारुक मुंबई १९९३ बॉम्बस्फोटात सक्रिय होता
* दाऊद इब्राहिमचा जवळचा नातेवाईक जबीर मोती याला लंडनमध्ये अटक
* नेताजींच्या अस्थी टोकियोतून भारतात आणाव्यात- अनिता बोस यांची नेताजींच्या ७३ व्या स्मृतिदिनी मागणी
* दररोज भारताचे जवान शहीद होत आहेत, सिध्दुंनी पाक लष्कर प्रमुखांची गळाभेट घेण्यापूर्वी याचा विचार करायला हवा होता- अमरिंदर सिंग
* जकार्ता आशियाई स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पूनियाने भारताला मिळवून दिले पहिले सुवर्ण पदक
* नेमबाजपटू अपुर्वी चंदेला आणि रवी कुमारला कांस्य पदक


Comments

Top