HOME   महत्वाच्या घडामोडी

१३ नद्यात अटलजींच्या अस्थींचे विसर्जन, केरळला रिलायन्स २१ कोटी, ०१ डिसेंबरपासून मराठा आंदोलन, नीट नो ऑनलाईन, विखे पाटलांना अटक करा.......२२ ऑगस्ट १८

नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय जाहीर न झाल्यास, राज्यात ०१ डिसेंबरपासून पुन्हा मराठा आंदोलन


१३ नद्यात अटलजींच्या अस्थींचे विसर्जन, केरळला रिलायन्स २१ कोटी, ०१ डिसेंबरपासून मराठा आंदोलन, नीट नो ऑनलाईन, विखे पाटलांना अटक करा.......२२ ऑगस्ट १८

* तोतया मालक उभा करुन केली प्लॉटची रजिस्ट्रील लातुरचा प्रकार सहाजणांना अटक
* शैलेश लाहोटीतुमची दृष्ट काढून घ्या- अमित देशमुख
* लातूर जिल्ह्यात सरसरीच्या ५६ टक्के पाऊस
* लातूरच्या एक नंबर चौकातील एका हॉटेलात राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक
* केरळ पूरग्रस्तांसाठी लातुरात निघाली मदत संकलन फेरी
* नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय जाहीर न झाल्यास, राज्यात ०१ डिसेंबरपासून पुन्हा मराठा आंदोलन
* नीटची परीक्षा ऑनलाइन नाही, परीक्षा होणार फ़क्त एकदाच, पुढची परीक्षा ५ जून २०१९ रोजी
* परदेशात उच्च शिक्षण घेणार्‍या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
* विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी विद्यार्थ्यांनाही परदेशात शिक्षणाची संधी
* पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा
* अभियांत्रिकीचा तिसऱ्या व अंतिम वर्षाचा आज निकाल
* अलिबागमधील नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीचा बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश
* अलिबाग, मुरुड येथील २७२ अनधिकृत बंगले मालकांना ०१ लाख दंड आणि ०५ वर्षाची शिक्षा होणार- पर्यावरण मंत्री, रामदास कदम
* नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येची कबुली सचिन अंदुरेने दिल्याने सीबीआयच्या आत्तापर्यंतच्या तपासावर प्रश्नचिन्ह
* नालासोपारा शस्त्रे आणि स्फोटक प्रकरण: वैभव राऊत आणि सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे घेतल्याचे चौकशीत उघड
* राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत सर्व जातीपाती आणि अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य
* राज्यातील १३ नद्यांत अटलजींच्या अस्थींचे होणार विसर्जन
* कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्री पूल शुक्रवारपासून पाडणार
* रिलायन्सची केरळ पूरग्रस्तांना २१ कोटीची तर सिद्धिविनायक ट्रस्टची ०१ कोटींची +मदत
* मराठा आरक्षण बंद काळात दरम्यान तोडफोड आणि जाळपोळ, पोलिसांना मारहाण करणाऱ्या पुण्याच्या २८ जणांना जामीन मंजूर
* दाऊदचा साथीदार जबीर मोतीचा जामीन लंडन कोर्टाने फेटाळला
नाशिकमध्ये कॅरम बोर्डची लाच मागणार्‍या बालसुधारगृहाच्या अधीक्षिका नलिनी पाटील आणि क्लार्क प्रशांत देसले यांना अटक
* सनातनच्या प्रमुखांना अटक करण्याची मागणी करणार्‍या राधाकृष्ण विखे पाटलांनाच प्रथम अटक करा- सनातन संस्था
* अभ्यासक्रम न देताच सेमिस्टर सुरू केल्याने एफ़टीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
* डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्राच्या घराची झडती
* राज्यसभा निवडणुक मतदानावेळी 'नोटा'चा पर्याय वापरता येणार नाही - सुप्रीम कोर्ट
* जम्मू- काश्मीरमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस चिनाब नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू
* देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ
* चंद्रावर सर्वात अंधाऱ्या आणि थंड भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी- नासाची माहिती


Comments

Top