HOME   महत्वाच्या घडामोडी

नोटाबंदीऐवजी हवी होती लोकसंख्या वाढ बंदी, अल्पवयीन गोविंदांच्या पालकांवर कारवाई, नोटांमधून गंभीर आजार, सनातनसाठी मोर्चा, स्वबळासाठी सेनेला उमेदवार मिळेनात.....०३ सप्टेंबर १८


नोटाबंदीऐवजी हवी होती लोकसंख्या वाढ बंदी, अल्पवयीन गोविंदांच्या पालकांवर कारवाई, नोटांमधून गंभीर आजार, सनातनसाठी मोर्चा, स्वबळासाठी सेनेला उमेदवार मिळेनात.....०३ सप्टेंबर १८

* भिवंडीत पुस्तक दहीहंडी, प्रथम येणार्‍याला ४०० पुस्तके भेट
* १४ वर्षाखालील गोविंदा आणि त्यांच्या पालकावर कारवाई
* नोटांमधून गंभीर आजार होण्याची शक्यता, नोटा अनेकांच्या हातातून जातात, त्यांना कसलेही विकार असतात
* खडसेंवरील अन्याय लवकर दूर होईल- चंदकांत पाटील, आता कसलीच इच्छा राहिली नाही- खडसे
* जतमध्ये चहाच्या टपरीसमोर गावकर्‍यांच्या समवेत अशोक चव्हाण यांची समस्यांवर चर्चा
* मंत्रालयाच्या नव्या पायर्‍या पाडणार, सुरक्षित पायर्‍या बांधणार
* सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात औरंगाबादेत चर्चा
* गुजरातेत पोलिसांनी गुंडांना दोरीने बांधून बडवीत काढली धिंड
* कोलकत्यात चौदा बालकांचे हाडांचे सापळे सापडले
* अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत बंद केले
* मराठी कलावंतांनीही घेतला दहे हंडीत सहभाग
* मै हूं डॉन गाण्यावर सातार्‍यात शिवेंद्र राजे यांचा डान्स
* माओवाद्यांशी संबंध, संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास राज्य सरकारला ९० दिवसाची मुदत
* राज्यात सामाजिक व धार्मिक एकोप्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी मतभेद विसरुन एकत्र यावे - शरद पवार
* पुण्यातील ‘सनबर्न’ महोत्सवात बॉम्ब फेकून निषेध नोंदवण्याचा कट साताऱ्यात शिजला- एटीएसच्या चौकशीतून उघड
* स्वबळासाठी उमेदवारांची चणचण, शिवसेनेचे इतर पक्षांत उमेदवारांचा शोध घेण्याचे सुरु
* बोरीवलीत दीड किलो सोने घेऊन पसार झालेला कारागीर ४८ तासांत गजाआड
* मुंबईत उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई
* कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी लाच मागतली जाते, पुणे कारागृह पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन
* भाजप सरकारला पिटाळून लावण्याची वेळ आली आहे- जनसंघर्ष यात्रेत अशोक चव्हाण
* सरकार फ़क्त घोषणा करते, सरकारला उघडे पाडणार, राळेगणसिद्धीत दोन ऑक्टोबरपासून आंदोलन- अण्णा हजारे
* मोदींनी नोटाबंदीऐवजी लोकसंख्या कमी करायला हवी होती- राज ठाकरे
* अवयवदान जनजागृतीसाठी २५ व २६ सप्टेंबरला राज्यभरात अवयवदान महोत्सव
* फेसबुकवरुन मैत्री करुन मुंबईमधील महिलेला दोघांनी घातला साडेचार लाखांचा गंडा
* शिस्तीबद्दल बोलायला गेलो की हुकूमशहा ठरतोय- नरेंद्र मोदी
* गुरुग्राममधील जमीन घोटाळा: रॉबर्ट वड्रांविरोधात एफआयआर दाखल
* मराठे, ओबीसींना आपसात लढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे षडयंत्र- काँग्रेसचे नाना पटोले
* रंजन गोगोई होणार नवे सरन्यायाधीश, ०३ ऑक्टोबर रोजी शपथ घेण्याची शक्यता
* खासदार राजू शेट्टींसह भाजप विरोधी सर्व पक्षांची होणार महाआघाडी- अशोक चव्हाण
* दाभोलकर हत्या: सचिन अंदुरेला १४ दिवसांची तर बाकी दोघांना १० दिवसांची कोठडी
* घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण सादर करुन बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार राज्य सरकार
* देशभरातील मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या अटकेच्या निषेधार्थ डाव्या पुरोगामी संघटनांनी केली निदर्शनं
* काँग्रेसच्या प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढविण्यास नाखूष, मुंबईत कृपाशंकर सिंह, गुरुदास कामत यांच्या पत्नी माहरुख यांची नावे चर्चेत
* देशभरात २०१३ पासून पावणेसहा लाख घरे विक्रीच्या प्रतिक्षेत
* पाकिस्तान बरोबर १९७१च्या युद्धातील ३६०० नौसैनिकांचा पेन्शनसाठी चार दशकांसून लढा सुरू
* पाऊस राज्यातील पाणी कसर भरून काढण्याची शक्यता, बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाची नोंद
* रायगडात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वयित
* कोळसा टंचाईमुळे चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद, हजार मेगावॅट वीज निर्मिती ठप्प
‘* शहरी नक्षलवाद ही संकल्पनाच अमान्य’- पी. चिदम्बरम
* राज्य सरकार १२ मजल्याच्या इमारतींना शुल्क घेऊन अधिकृत करणार, दंड आकारण्याचे अधिकार मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थांना
* सुप्रीम कोर्टात पूर्णत: महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ


Comments

Top