* लातूर मनपा स्थायी समितीचे सभपती गोजमगुंडेंसह सदस्यही राहणार कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
* लातुरच्या वरवंटी डेपोवरील कचरा कमी करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
* शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणार्या २१ वहनांना दंड
* नीट न काम करणार्या स्वच्छता कर्मचार्यांवर होणार कारवाई, लातूर मनपा आयुक्त घेणार दररोज एका प्रभागाचा आढावा
* पेट्रोल-डिझेलचे दर आज राहिले स्थिर
* आधार कार्डच्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार निर्णय
* जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळाची संख्या ५० टक्यांनी कमी करण्याचा निर्णय
* जिल्हा परिषद कृषी अधिकार्याला मिळणार राजपत्रित अधिकार्याचा दर्जा
* लालबागच्या मिरवणुकीतून हरवलेला मुलगा अद्यापही सापडेना
* यंदा २० ऑक्टोबर पासून गाळप सुरु होणार, मंत्रीमंडळाचा निर्णय
* साखरेवर पाच टक्के जीएसटी
* ऊसाच्या एफआरपीत बदल केल्याच्या निर्णयाच्या विरोधात राजू शेट्टी न्यायालयात
* गणपती बाप्पा मोरया म्हटल्याबद्द्ल वारिस पठाण यांनी मागितली मुस्लीम समाजाची जाहीर माफी
* मुकेश अंबानीनी मिळवला सलग सातव्या वर्षी भारतातला पहिला श्रीमंत ठरण्याचा मान
* मुकेश अंबानी यांचे दर दिवसाचे उत्पन्न ३०० कोटी- 'बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट २०१८' ची माहिती
* जिंतुरच्या स्मशानात झाली रात्री वाढदिवसाची पार्टी, मांसाहारही केला
* जिंतुरच्या हिंदुत्ववादी संघटनांनी केला निषेध, गोमूत्र शिंपून केले शुद्धीकरण
* मुंबईच्या ०९.९८ लांबीच्या कोस्टल रोडला परवानगी
* मराठी साहित्य संमेलनासाठी निवडणुकीची पद्धत रद्द, झाली घटना दुरुस्ती
* उदयनराजे यांच्या उमेदवारीला कुणाचाही विरोध नाही- शरद पवार
* राफेल विमानाची किंमत जाहीर करायला काय हरकत आहे- शरद पवार
* शिक्षणमंत्री आणि प्राध्यापक संघटनात बैठक, मागण्या तत्वत: मान्य, लेखी अश्वासनानंतरच आंदोलन मागे
* दिवाळी-पाडव्याला मराठा समाज पक्ष स्थापनेचा मुहुर्त
* रवीना टंडन झाली नॅशनल पार्कची ब्रॅंड अॅम्बासिडर
* वेतन वाढीसाठी राज्यातील वसतीगृह कर्मचार्यांचे आंदोलन
* शासकीय गाड्या होणार आता इलेक्ट्रिक, राज्यातील पाच इलेक्ट्रिक कारचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरण
* व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही- पर्यावरण मंत्री रामदास कदम
* ग्रामीण भागातील मुलींना १२ वीपर्यंत मिळनार एसटीचा मोफत प्रवास, ज्येष्ठांना मिळणार शिवशाहीत सवलत
‘* डीजे’ बंदीच्या विरोधात पुण्यातील वकील जाणार सर्वोच्च न्यायालयात
* १९९३ मुंबई बॉम्बस्फोटात राजकीय गुन्हेगारीकरण गँगस्टर, पोलीस, सीमा शुल्क अधिकारी, राजकीय संरक्षकांच्या नेटवर्कमधून - घटनापीठाचे मत
* जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांना भेटणार
* सावरगावला भगवान बाबांचे नवे स्मारक उभे राहणार- पंकजा मुंडे
* अण्णासाहेब पाटील महामंडळाला देणार कॅबिनेट दर्जा- मुख्यमंत्री
* भाडेपट्टय़ाने दिलेल्या सरकारी जमिनी रेडी ताबेदारांच्या नावाने करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
* मेळघाटमधील कुपोषणासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्था करणार अभ्यास
* जंजिऱ्यावर कायमस्वरूपी फ़डकणार तिरंगा
* औरंगाबादमधील शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नुतनीकरणास ०३ ऑक्टोबरपासून प्रारंभ
* डॉ. भरत वाटवानी यांचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरमने केला सत्कार
* लोकशाही तत्वांच्या जपणुकीसाठी पुण्यात 'पेन काँग्रेस'मध्ये दिला जाणार 'पेन गौरी लंकेश पुरस्कार' व्यंगचित्रकार पी. मेहमूद यांना
* आमची दिशाभूल करणाऱ्या स्वयंघोषित समन्वयकांना धडा शिकवू- मराठा क्रांती ठोक मोर्चा
* प्रत्येक उमेदवाराविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाने तीनदा जाहीर करावी- सुप्रीम कोर्ट
* गुन्हेगार राजकारणात येणार नाहीत याची जबाबदारी संसदेची, हे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी सरकारने कायदा करावा- सुप्रीम कोर्ट
* अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही म्हणून भगवान श्रीरामांनी माझ्या स्वप्नात येऊन रडले- शिया वक्फ बोर्डाचे सैयद वसीम रिझवी
* राफेल विमान खरेदी: ही तर केवळ सुरुवात, पुढे तर आणखी मजा येणार आहे, प्रत्येक निर्णयातील घोटाळा उघड करणार - राहुल गांधी
* काँग्रेस पक्ष भिंग घेवून देशात शोधावा लागतोय, भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसने भारताबाहेर आघाडीचा शोध सुरू केला आहे- नरेंद्र मोदी
* सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणावर अंतिम सुनावणी ०३ ऑक्टोबरला
* स्वतंत्र खलिस्तानच्या नावाखाली ३६ हजार निरपराध्यांची हत्या करणाऱ्या भिंद्रनवालेंना संत म्हणणे ही शोकांतिका- मनजितसिंह बिट्टा
* भारत व पाकमधील राजकीय तणाव व बिघडलेल्या व्यापारी संबंधांमुळे द्विपक्षीय व्यापार अवघड
* महाराष्ट्राची नेमबाज राही सरनौबत अर्जुन पुरस्काराने सन्मानित
* विराट कोहलीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान
Comments