HOME   महत्वाच्या घडामोडी

७० हजार औषधी दुकाने राहणार बंद, लतादिदींचा आज वाढदिवस, माईक टायसन भारतात, विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट.......२८ सप्टेंबर २००१८

लातुरात सकाळपासूनच औषधी दुकाने बंद


७० हजार औषधी दुकाने राहणार बंद, लतादिदींचा आज वाढदिवस, माईक टायसन भारतात, विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट.......२८ सप्टेंबर २००१८

* औषधांची ऑनलाइन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरात आज औषध विक्रेत्यांचा संप
* औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपामुळे, ७० हजारांहून अधिक दुकाने राहणार बंद
* हैद्राबादचे औषध विक्रेते संपात सहभागी होणार नाहीत
* नालासोपारा भागातील १५ मुलींवर बलात्कार करणारा सिरियल रेपिस्ट रेहान कुरेशी याला अटक
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस
* आज लता मंगेशकर पुरस्कारांचीही घोषणा होणार
* आज तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार
* जगद्विख्यात बॉक्सर माईक टायसन भारतात दाखल
* पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले
* स्वत:चा गळा कापून आत्महत्या करण्याचा नागपुरच्या सरकारी दवाखान्यात महिला डॉक्टरचा प्रयत्न
* भिमा कोरेगाव प्रकरणातील पाच संशयित मओवाद्यांच्या प्रकरणी आज अंतिम निकाल
* भाव मिळत नसल्याने औरंगाबादेत शेतकर्‍यांनी टोमॅटो दिले रस्त्यांवर फेकून
* ब्र', 'भिन्न', 'कुहू' कादंबर्‍यांच्या लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात न्यूमोनियाने, त्या ५१ वर्षांच्या होत्या
* वॉलमार्टचा किराणा सामानाच्या विक्रीत शिरकाव, किराणा दुकानेही राहणार बंद
* विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
* विवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता गुन्हा ठरत नाही तर तीन तलाक तरी गुन्हा कसा ठरू शकतो?- असदुद्दीन ओवेसी
* स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत सातारा जिल्हा परिषद देशात पहिली, नरेंद्र मोदी करणार ०२ ऑक्‍टोबरला गौरव
* पुण्यातील मुठा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया, जलसंपदा विभागाच्या बेफिकीरीमुळंच हा प्रकार घडला- सजग नागरिक मंच
* भाजपच्या गलथान कारभाराचा पुणेकरांना फटका बसला, कालव्याची डागडुजी करणे गरजेचे असताना केले दुर्लक्ष- अजित पवार
* नरेंद्र मोदी यांच्या हेतुविषयी लोकांच्या मनात काही शंका असेल असे मला वाटत नाही- शरद पवार, अमित शहांनी मानले पवारांचे आभार
* सोसाट्याचा वारा आणि विजांच्या लखलखाटासह मुंबईत पावसाची हजेरी
* भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दाच सापडत नसल्याने विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत- रावसाहेब दानवे
* काँग्रेस-राष्ट्रवादीला १५ वर्षांत जमला नाही इतका विकास भाजप- सेना सरकारने चार वर्षांत केला- मुख्यमंत्री
* जाहीर व्यासपीठावर कामगिरीची तुलना करण्यासाठी विरोधकांनी समोर यावे- मुख्यमंत्री
* मतदारांशी वैयक्तिक संपर्क ही भाजपची ताकद, कार्यकर्त्यांनी संपर्क साधून सरकारची कामगिरी मतदारांना दिली
* २०१४ पेक्षा जास्त मते मिळवून केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार
* नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजपाचा पराभव
* जिओ मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स:
* सर्वोत्कृष्ट चित्रपट - कच्चा लिंबू
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - प्रसाद ओक, कच्चा लिंबू
* सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमेय वाघ 'मुरांबा'
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी, कच्चा लिंबू
* पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट बालकलाकार- साहिल जोशी 'रिंगण'
* सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार- अभिनय बेर्डे, मिथिला पालकर
* दिल्लीत जीएसटी काउन्‍सिलची आज बैठक
* मशिदीत नमाज पठण करणं हा इस्लामचा अभिन्न भाग नसल्याच्या निर्णयाचं पुनरावलोकन करण्याची गरज नाही- सर्वोच्च न्यायालय
* २९ ऑक्टोबरपासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी, घटनास्थळाचा विवाद घटनापीठाकडे जाणार नाही- सर्वोच्च न्यायालय
* सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्णयाचं संघानं केलं स्वागत
* खाते उघडण्यासाठी आधार कार्डाची गरज नाही, बँकांना करावा लगणार नियमात बदल
* शिक्षण प्रणाली आपल्या संस्कृतीला अनुरुप नसेल तर प्रगती निरर्थक- अमित शहा
* देशात पुरेसाच नव्हे तर गरजेपेक्षा अधिक प्रमाणात रोकडसाठा- रिझर्व्ह बँक


Comments

Top