* गोकुळ दूध संघाच्या आमसभेत दगडफेक आणि चप्पलफेक
* कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, पैसे जमवण्यासाठी आटापिटा सुरु
* अनुदानित गॅसच्या दरात ०२ रुपये ८९ पैशांची वाढ
* पाकिस्तानी हेलिकॉप्टरची भारतीय क्षेत्रात घुसखोरी, सैनिकांनी केला गोळीबार, हेलीकॉप्टर गेले माघारी
* बारावीच्या परिक्षांचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
* बीडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा
* मुख्यमंत्र्यांनी घेतले साईबाबाचे दर्शन
* पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी महागले
* वर्ध्यात साकारला जगातला सर्वात मोठा चरखा
* जपानला चक्रीवादळाच तडाखा
* ढाले आणि आठवले यांच्यातील दुरावा मिटला
* डिसेंबरपूर्वी राज्यातील आदिवासींना वन जमिनीचे वाटप करणार - देवेंद्र फडणवीस
* अश्वासन देऊन वर्ष उलटले तरी विकास निधी न मिळाल्यामुळे सेनेचे आमदार नाराज
* सेनेच्या आमदारांना पाच कोटींचा विकास निधी मिळावा अशी उद्धव ठाकरे यांची होती मागणी
* अण्णा हजारे यांच्या मंगळवारपासून राळेगणसिद्धी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी पूर्ण, मागण्यांबाबत पत्र येण्याची अण्णांना प्रतिक्षा
* गांधी हा विचार, तो सर्वदूर पोहचणे आवश्यक, एक दिवस साजरा करून नंतर विसरण्यासाठी हा काही इव्हेंट नाही- गांधीवाद्यांचे मत
* पश्चिम विदर्भात ७५० शेतकऱ्यांच्या आत्माहत्यांपैकी २४० प्रकरणे अपात्र
* ४६ हजार कोटीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धीसाठी जमीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार
* भाव वाढवून देण्याचे तर झाडांचे पैसे देण्याचे आमिष तर पैसे अडवून ठेवण्याची दमदाटी केली जात असल्याची तक्रार
* भगवान अय्यप्पाच्या ‘खऱ्या महिला भक्त’ नाही तर ‘महिला कार्यकर्त्यां’ शबरीमला मंदिरात येतील- मंदिर व्यवस्थापन अध्यक्ष
* मुद्रांक शुल्क अधिभारातून पुणे महापालिकेला ७६ कोटी मिळणार
* नांदेड जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा विहिरीत बुडून मृत्यू
* पुणे येथे 'गुरु-वंदना' कार्यक्रमात पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर व बासरीवादनाची जुगलबंदी
* शिवडीत आठशे रुपये मोज्यांच्या ऑनलाइन खरेदीत ज्येष्ठ नागरिकाला मोटारकारची लॉटरी लागल्याचे सांगून साडेआठ लाखाला गंडा
* पेट्रोल-डिझेलनंतर आता एलपीजी, सीएनजी आणि विमान इंधन दरात वाढ, विमान प्रवास महागणार
* पेट्रोलने शंभरी गाठली तर 'पेट्रोल मीटर' बंद होण्याची भीती
* गांधी जयंती म्हणजे सुट्टीचा दिवस, शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात
* विरोधकांच्या आरोपांची धार कमी करण्यासाठी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर प्रचार करण्यावर भाजपचा भर
* राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरावेत पण सरदार वल्लभभाई पटेलांवर टिका करु नये- नरेंद्र मोदी
* पटेलांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असल्याचा राहूल यांचा आरोप, मोदींच्या बूट आणि शर्टप्रमाणे पुतळाही ‘मेड इन चायना’ असल्याचे म्हणणे
* बेळगावमधील सीआरपीएफ़ प्रशिक्षण केंद्रात स्फोट होऊन ०४ जखमी
* नरेंद्र मोदींनी केले राजकोट येथे महात्मा गांधी संग्रहालयाचे उद्घाटन
* पाकिस्तानमधील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम 'आरएसएस' करत असल्याचा पाकचा आरोप
Comments