* संजय ओहळ आणि व्यंकटेश पुरी लातूर कॉंग्रेसचे प्रवक्ते
* लातूर मनपातील ‘त्या’ आठ नगरसेवकांचा अपात्रतेचा धोका टळला
* दर्जी बोरगाव शिवारात वाळू माफियांचा संतोष गायकवाड या पोलिसावर हल्ला, सुदैवाने बचावले
* लातूर महानगरपालिका तोटी नसलेले नळ तोडणार
* औशाच्या नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्षांना अपात्रतेची नोटीस
* लातुरच्या स्त्री रुग्णालयाला मनपाने दिले रमाई आंबेडकरांचे नाव
* लातूर जिल्ह्यात ५९३ परवानाधारक खाजगी सावकार
* लातूरच्या शेतकर्यांचे हरभर्याचे १२ कोटी रुपये सरकारकडे थकले
* आ. राहूल कुल यांची हत्या झाल्याची अफवा पसरवणार्यांना दोघांना अटक
* आज पेट्रोल १२ तर डिझेल १७ पैशांनी वाढले
* कल्याणमध्ये एक कोटी रुपये किमतीचे प्लास्टीक जप्त
* नीरव मोदीची ६५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
* आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती
* सोनिया गांधी यांनी राजघाटावर केले महात्मा गांधी यांना अभिवादन
* बीसीसीआयही आले माहिती अधिकाराच्या कक्षेत
* कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ राहूल गांधी सेवाग्राम येथून करणार
* सेवाग्राम येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजपा हटाव नारा
* शेतकर्यांना हमी भाव आणि लोकपालसाठी अण्णा हजारे यांचे आजपासून आंदोलन
* आज एमआयएम आणि भारीपची औरंगाबादेत संयुक्त सभा
* हवामान खात्याचे अंदाज सलग पाचव्या वर्षीही चुकले
* ईशान्य भारतातील अपुऱ्या पावसामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पावसाची नोंद- भारतीय हवामानशास्त्र विभाग
* कोल्हापुरच्या भवानी मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव
* देवस्थानच्या राज्यातील ०३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू
* बीडच्या शरद पवार यांच्या सभेत क्षिरसागर काका पुतण्याचा संघर्ष आला समोर
* दसर्यापूर्वी ऊसतोड कामगारांबाबत निर्णय न घेतल्यास कोयता बंद- पंकजा मुंडे
* आजपासून दिल्ली-शिर्डी विमान सेवा सुरु होणार
* मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात, मराठवाडा जून कोरडाच
* मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही, त्यांना दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती नाही- शरद पवार
* विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये ५९ रुपयांची तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत ०२.८९ रुपयांची वाढ
* गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यातील १०२ कैद्यांची शिक्षा होणार माफ
* राष्ट्रपित्याची शासनमान्य प्रतिमा सरकारी मुद्रणालयात उपलब्ध नसल्याचे उघड
* झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकाला मिळणार ३०० चौ. फूट क्षेत्रफळाचे घर
* किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या कायदेशीर परवानगीसाठी दीड लाखाची लाच मागणार्या जे. जे. रुग्णालयात दोनजणांना अटक
* रावण बुद्धिमान असून दहा डोक्याने विचार करणारा होता, आजच्या काळात रावणाची बाजुही समजून घ्यायला हवी- नागराज मंजुळे
* डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवप्रेरणा पॅनेलचा पराभव, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना घेतले फैलावर
* भाजप- सेना युती: विद्यमान लोकप्रतिनिधींचा युतीचा आग्रह तर निवडणुकीतील पराभूत आणि इच्छुकांचा स्वबळाचा आग्रह
* नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी नागपूरमधील संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
* विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अधिक वेतन दिवाळी बोनस म्हणून मिळणार
* औरंगाबाद येथे कारमध्ये अवैध देशी दारुची तस्करी, द्वारकाधीश जैस्वालला अटक
* युपीएससीसाठी परीक्षांसाठी भरलेला अर्ज विद्यार्थ्यांना घेता येणार मागे
* भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती
* माजी खासदार प्रिया दत्त यांची काँग्रेसच्या सचिवपदावरून हकालपट्टी
* ९१ हजार कोटींच्या कर्जात बुडालेली इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्सिएल कंपनी ताब्यात घेण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न
Comments