* लातूर मनपाने वरवंटी कचरा डेपोवर बसवली रोज एक हजार टन कचरा विघटन करणारी यंत्रणा
* वरवंटी डेपोवरचा कचरा दोन वर्षात नाहीसा होण्याचा दावा
* लातूर जिल्ह्यातील पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित
* लातूरचे व्यापारी सुरेश भुतडा यांच्या स्कूटरच्या डीकितून पळवले अडीच लाख
* लातूर शहरासाठी ०५ मेगावॅटचा सौर उर्जा प्रकल्प मंजूर, जागेचा शोध सुरु
* अटल महा आरोग्य शिबिरासाठी २० हजारांची नोंदणी, ०७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री करणार उदघाटन
* रंजन गोगोईंनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
* भारत-विंडीजचा वन डे सामना होणार विशाखापट्टणमला
* कॉंग्रेससोबत युती करण्यास मायावतींचा नकार
* दसर्यानंतर उध्दव ठाकरे देणार अयोध्येला भेट
* वातावरणातील आर्द्रता आणि सरासरीपेक्षा अधिक तापमानामुळे मुंबईकर हैराण
* मान्सून परतीला, ०६ ते ०८ ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबामुळे केरळ, गोवा व महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका
* महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा, आरपीआयच्या नेत्याला मिळाणार अधक्षपद- मुख्यमंत्री
* इंदू मिलमधील स्मारकातील बाबासाहेब आंबेडरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप चुकीचा- मुख्यमंत्री
* पुतळ्याच्या उंची पेक्षा बाबासाहेबांच्या विचाराची उंची कुणीच गाठू शकत नाही, राज्यघटना बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही - मुख्यमंत्री
* कुठल्याही परिस्थितीत आरक्षण कायम राहील, एक जरी वंचित असेल तोपर्यंत आरक्षण कायम, ही सरकारची भूमिका- मुख्यमंत्री
* कोरेगाव भीमा संघर्षात हात असल्याचा आरोप असलेल्या गौतम नवलखाच्या नजरकैद सुटकेविरोधात राज्य सरकारची याचिका
* रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाने उद्धव ठाकरे यांना दिले अयोध्या वारीचे निमंत्रण
* राज्याच्या ग्रामीण भागात अनुसूचित जाती आणि जमातीला २०१९ पर्यंत तर शहरात २०२२ पर्यंत मिळणार हक्काचे घर
* रस्ते बांधणी आणि परिवहन उद्योगात भारत आणि रशिया द्वीपक्षीय सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
* राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूरमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापणार
* संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत ४० टक्के ते ७९ टक्के दिव्यांगांना ८०० रुपये तर ८० टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांगांना मिळणार एक हजार
* अटल सौर कृषीपंप योजने अंतर्गत राज्यामध्ये ०७ हजार सौर कृषीपंप लावण्यास मंजुरी
* पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
* आयुर्वेदातील कान, नाक, घसा तज्ज्ञांची ०७ ऑक्टोबरला पुण्यात परिषद
* शरद पवारांवर टीका केल्यानेच राजकारणात मोठे होता येते, त्यामुळेच ओवेसींची पवारांवर टीका- खासदार सुप्रिया * सुळे
* आंबेडकर-ओवेसी आघाडीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही- रामदास आठवले
* कुलभूषण जाधव यांच्यावरील कथित हेरगिरीच्या आरोप प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात पुढच्या वर्षी १८-२१ फेब्रुवारीदरम्यान सुनावणी
* अंबाबाईच्या दर्शनासाठी तोकड्या पोषाखात येणाऱ्या भाविकांना प्रवेश न देण्याच्या निर्णयावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ठाम
* औरंगाबादेत विवाहितेला कामाचे आमीष दाखवून अनेकदा बलात्कार करणारा, तिचा फोटो परराज्यात पाठवून ०५ लाखांची मागणी करणारा गजाआड
* समृद्धी महामार्गाच्या ११ पॅकेजना मंजुरी, प्रकल्पाचा खर्च गेला ५५ हजार कोटींवर, या महिन्यात उदघाटन अपेक्षित
* नाशिकमधील डेंग्यू,स्वाईन फ्लूला जबाबदार धरत आयुक्त तुकाराम मुंढेंनी आरोग्य अधीक्षकाम्ची उचलबांगडी
* परदेशात जाण्यासाठी दुचाकी चोरून विकणारा तरुण २० दुचाकीसह मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* 'मुंबई मेट्रो-३' साठी आरे कॉलनी परिसरातील वृक्षतोड वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीनेच- मेट्रो रेल कॉर्पोरेशन
* रेल्वे स्थानके आणि परिसराचा व्यावसायिक विकास करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, लीजची कालमर्यादाही होणार ९९ वर्ष
* वाढीव इंधन खर्चावर मार्ग काढण्यासाठी परिवहन महामंडळाचा भाडेवाढीचा विचार, वाढ १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
* पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार प्रदान
* राफेल करार हे ‘चांगले पॅकेज’, त्याचे अनेक फायदे, ही विमाने उपखंडात ‘गेम चेंजर’ असतील- हवाई दल प्रमुख
* प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा विचार
* आघाडीबाबात निर्णय घेण्यासाठी त्या-त्या राज्यात प्रदेश काँग्रेसची समिती
* मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार, काँग्रेससोबत आघाडी नाही- मायावती
* भाजपला सोडून इतर राजकीय पक्षांना कमकुवत करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न- मायावती
* काँग्रेसमध्ये आघाडीचा डीएनए नाही तर घराणेशाहीचा डीएनए- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
Comments