* भाजपने देशावर आर्थिक संकट आणले- प्रकाश आंबेडकर
* मुंबई पुणे महामार्गावर २०३० पर्यंत टोल वसूल करणार
* प्रतापगडावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या
* औरंगाबादेत आठ घरातून १९ तलवारी जप्त
* अभिनेत्री तनुश्री दत्तावर केजच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
* राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल तनुश्रीवर गुन्हा
* महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त, डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात
* पावसाच्या अवकृपेने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट
* मराठवाड्यातील ०३ हजार गावांवर दुष्काळाचे संकट
* राज्यातील जलसाठ्यात चिंताजनक घट, अनेक ठिकाणी टॅंकर सुरु
* अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ निवडणुकीत उतरण्याची शक्यता
* यवतमाळच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीला शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करणार
* स्मारकांसाठी पैसे नाहीत, राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण? - सामनातून सेनेचा प्रश्न
* शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत, राज्य गहाण ठेवू असे मुख्यमंत्र्यांचे होते वक्तव्य
* मुख्यमंत्री येतात व जातात, पण राज्य कायम राहते, त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा योग्य नाही
* ‘अतिउत्साही’ वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची ‘इभ्रत गहाण’ ठेवण्याची वेळ येऊ शकते
* मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका- सामनातून दिला इशारा
* बाबासाहेब आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती
* शेतीमालाला आश्वासित भाव दिला नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, जो मंत्री हाती सापडेल त्याला कपडे काढून भर चौकात चोपा- राजू शेट्टी
* मंत्र्यांना मारले जात असल्याचे पाहायला मिळाले तरच त्यावर बोलणे योग्य ठरेल, पोकळ डरकाळ्यावर बोलण्याला अर्थ नाही- सदाभाऊ खोत
* ब्राह्मण ही जात अथवा धर्म नसून, ती व्यवस्था, या समाजात ऐंशी टक्के गरिबी, त्यांनीही आरक्षण का मागू नये?- महादेव जानकर
* ब्राह्मण समाजासाठी नवी योजना तयार केली जाईल- महादेव जानकर
* गुजरातला जमतं ते महाराष्ट्राला का नाही? - इंधन दरांवरुन धनंजय मुंडेंचा प्रश्न
* बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची २६० फुटांवरून ३५० फूट करावी- रामदास आठवले
* हिवाळी अधिवेशनात मंत्र्याच्या किमान पाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिकाच राष्ट्रवादी करणार प्रसिद्ध
* पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार १७ फेब्रुवारी २०१९ रोजी
* महिलांबद्दल अपशब्द वापरले, तर त्यांना घरात शिरून लाटण्य़ाने नीट करू- खासदार सुप्रिया सुळे
* रुपयाचे अवमूल्यन होण्यास भाजप आणि संघ जबाबदार, आमची लढाई त्यांच्याशीच, काँग्रेसने लोकसभेच्या १२ जागा द्याव्यात- प्रकाश आंबेडकर
* देशांतर्गत विमानप्रवासासाठी आता बोर्डिंग पासची गरज नाही, प्रवाशाचा चेहराच असणार बोर्डिंग पास
* वाराणसी, विजयवाडा, पुणे ,कोलकाता, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये अशा बोर्डिंग पासची सुविधा होणार सुरू
* रयत क्रांती संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त २४ ऑक्टोबरला वारणा कोडोली येथे ऊस परिषद- सदाभाऊ खोत
* उज्ज्वला गॅस योजना निकषाचा सोयीचा अर्थ काढून लाभार्थीची अडवणूक करू नका- सदाभाऊ खोतांनी सुनावले गॅस कंपन्यांना
* राज्यातील ०७ ते १८ वयातील लहान मुले तंबाखूच्या आहारी जात असल्याची माहिती उघड
* देशभक्तीचा आव आणणाऱ्या भाजप, संघातील कोणी बलिदान दिले आहे काय? त्यांनी देशासाठी काय केले?- काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे
* राज्य भयमुक्त करा, कवी दिनकर मनवर यांना येत असलेल्या धमक्यांप्रकरणी अडीचशे साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
* मकरंद अनासपुरेंच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमात नितीन गडकरी............
* २०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, त्यामुळं आश्वासनं दिली
* शरद पवार यांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. पवार काय बोलतात आणि काय करतात हे कळतच नाही
* उद्धव ठाकरेंनी शिवेसेनेचे चांगले नेतृत्व केले, मराठी माणसाबद्दल त्यांना आपुलकी
* रामदास आठवलेंना कुठे काय बोलावे आणि कविता कधी म्हणावी समजत नाही, ते मुद्दाम करत नाहीत. पण त्यांच्याकडून अशा चुका होतात
* २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा कल नरेंद्र मोदींकडेच, पण २०१४ च्या तुलनेत जागा कमी होतील - एबीपी आणि सी-व्होटरचे सर्वेक्षण
* राफेल प्रकरणी चौकशी करण्याची अरुण शौरी, यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण यांची सीबीआयकडे मागणी
* सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी
* ०७ रोहिंग्यांना म्यानमारला परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Comments