* गंजगोलाईत छोट्या व्यावसायिकांना पोलिसांकडून वाईट वागणूक, मुस्लीम विकास परिषद पोलिसांविरोधात करणार ठिय्या आंदोलन
* २१ ऑक्टोबर रोजी व्हीएस पॅंथर्सकडून लातुरच्या आंबेडकर पार्क येथे नोकरी मेळावा
* लातुरात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु
* कोकणच्या हापूस आंब्याला जीआय मानांकन प्राप्त
* हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर, कोकण परिसरातील आंब्यांनाच हापूस म्हणता येणार
* अभिनेते विनोद खन्ना यांची आज जयंती
* लातूर बाजार समितीकडून बुधवारी शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ
* लातुर जिल्ह्यात अनधिकृत पाणी उपसा करणार्यांवर जिल्हाधिकारी करणार कारवाई
* दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक
* राज्याच्या २०१ तालुक्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती, केंद्राच्या दुष्काळ निकषात सर्व तालुक्यांचा समावेश- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
* लातुरात २२ कूल बसेसवर कारवाई, ३० बसेस मालकांना दिल्या नोटिसा
* भिवंडीच्या एका शाळेत वर्ग बंद करुन रिझवान नामक विद्यार्थ्याला इतरांनी केली बेदम मारहाण
* लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तीन दिवसांच्या लातूर दौर्यावर
* माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, वीरेंद्र सहवाग, कपिल देव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा विचार
* लगेच निवडणुका झाल्या तर भाजपचे होणार नुकसान- जनमत चाचणी अहवाल
* शिवसेना स्वबळावर लढल्यास कॉंग्रेस आघाडीला होणार फायदा- जनमत चाचणी अहवाल
* आघाडीत येण्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरु- अशोकराव चव्हाण
* मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा कोणतेही महत्वाचे काम असूच शकत नाही, सबबी सांगून बैठकींना न येणार्यांना दरवाजे बंद होतील- मुख्यमंत्री
* राज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा ०१ मार्चपासून
* अॅट्रॉसिटी कायद्यावरील सुनावणी चार आठवड्यानंतर
* एसटीची दिवाळीसाठी ‘विशेष’ वाहतूक, ०१ ते २० नोव्हेंबर दरम्यान ०९ हजार ३२० जादा बसेस सोडणार
* खडकवासला कालवा दुर्घटनेची कारणं सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
* औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा ६० वर्षांच्या इसमास दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा
* औरंगाबाद- जालना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेने केले शिटी वाजवून कानठळ्या आंदोलन
* डॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर, ०५ नोव्हेंबरला पुरस्काराचे वितरण
* पुणे येथे लोखंडी होर्डिंग कोसळून ०४ ठार, ०७ जखमी
* सत्ता लाल दिवा घेऊन मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हवी- सुप्रिया सुळे
* शिवसेनेची स्थिती ‘एक हात मे दो लड्डू’, ते सरकारवर टीकाही करतात आणि सत्तेतही राहतात- सुप्रिया सुळे
* मुंबई महापालिकेचे जल अभियंत्याच्या मुलाला दादर, माहीम चौपाटीच्या स्वच्छतेचे ११ कोटीचे कंत्राट
* राम मंदिर बांधण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत संसदेत कायदा झाला नाही तर आंदोलन- विश्व हिंदू परिषद
* आगामी निवडणुकीत आधी भाजपचा पराभव, नंतर पंतप्रधानपदाचा विचार, मित्रपक्षांची इच्छा असेल तरच पंतप्रधान होऊ - राहुल गांधी
* तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहण्यासाठी शाळा- महाविद्यालयात एक तास खेळासाठी राखीव ठेवा- सचिन तेंडुलकर
* छत्तीसगडमध्ये एकेकाळी फक्त गोळ्यांचा आवाज होता, २००३ पूर्वी सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसची क्षलवाद्यांशी हातमिळवणी होती- अमित शहा
* पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरात घट, तेल कंपन्याचीही इंधनदरात एक रुपयाची कपात, कंपन्यांच्या समभागांत घट
* पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकही जागा मिळू नये यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवंय- ममता बॅनर्जी
* सौदी अरेबिया सरकारने भारताला हज यात्रेकरूंचा कोटा वाढवून द्यावा- पर्यटन मंत्री जयकुमार रावल
* पंतप्रधान इम्रान खान यांच्या बनी गाला येथील अनधिकृत घरावर कारवाई करा- पाक सर्वोच्च न्यायालय
* दहशतवादाविरोधात नव्याने ठोस मोहीम राबविण्यासाठी अमेरिकेचा पाकवर दबाव
* भारत आणि रशियामध्ये आठ महत्त्वपूर्ण करार, दहशतवादाविरोधात भारत आणि रशिया एकमेकांसोबत - नरेंद्र मोदी
Comments